पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जनतेची माफी मागावी

शहरात आलेल्या पुराला भाजप जबाबदार

News34

 

चंद्रपूर शहरात पावसामुळे झालेल्या आपत्तीला भाजप जबाबदार – मयूर राईकवार (आप)

काही तासांच्या पावसाने चंद्रपूर शहराला भीषण आपत्तीचा सामना करावा लागत आहे. शहरात झालेल्या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहराच्या विकासाच्या नावाखाली चमकोगिरी करण्याकरिता कोटय़वधींचा खर्च केला जात असला तरी शहराचे पाणी वाहून नेणाऱ्या इराई नदीचे खोलीकरन होत नसल्याचे या आपत्तीचे प्रमुख कारण आहे.

 

आम आदमी पक्ष व वृषाई कडून इराई नदी चे खोलिकरण करण्याची मागणी वारंवार निवेदनातून करण्यात आली होती पण सत्ताधारी भाजपा ने खोदकाम न केल्यामुळे शहराचे पाणी नदीत वाहून जाणे बंद झाले आणि पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पाणी साचले, अनेकांच्या घरात पानी शिरले त्यामुळे नागरिकांना गंभीर समस्या व संकटांना सामोरे जावे लागत आहे.

 

सत्ताधारी पक्ष भाजपने या जीवघेण्या परिस्थितीची जबाबदारी घेतली पाहिजे . शहराच्या विकासाच्या नावाखाली नदीचे खोदकाम न केल्याने त्याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांच्या जीवनाशी होत आहे.
काही वर्षांपूर्वी भाजपने इराई नदीचे खोलीकरण हाती घेतले होते प्रचंड गाजावाजा केला परंतु ते करोडो रुपये भ्रष्टाचारात गेले त्याचा चंद्रपूरकरांना काहीच फायदा झाला नाही. फक्त भाजपाच्या कंत्राटदारांना याचा फायदा झाला.

शहराच्या विकासाच्या नावाखाली समस्या दूर करण्याऐवजी भाजपाने मलाईदार कामांना प्रथम स्थान दिले, त्यामुळेच आज जनतेला हा त्रास सहन करावा लागत आहे, त्यासाठी पालकमंत्र्याने जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी. आणि इराई नदीचे खोदकाम लवकरात लवकर करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करन्यात आली आहे.

 

 

नालेसफाई च्या नावाने जनतेचा पैसा पाण्यात मनपाप्र शासनाचा काळाबाजार उघड – राजीव कक्कड

काल दिनांक १८/०७/२०२३ ला चंद्रपूर महानगर पालीका शहरी भागात पहील्यांदाच पडलेल्या पावसात स्थीती अशी होती की नाल्याचे पाणी रस्त्यात, रस्त्याचे पाणी लोकांच्या घरात, व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि लहान मुले शाळेत अडकले.

त्या कुटुंबांना राष्ट्रवादी कांग्रेसमुळे मिळाले बळ

चंद्रपूर शहर महानगर पालीकेतील अधिकारी या अगोदर तेथील परिस्थिती पहायला आले नाही. प्रत्येक प्रभागातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे लोकांना घराच्या बाहेर निघता येत नव्हते. २०१२ च्या अगोदर नगर परिषद असतांना सुध्दा अशी परिस्थिती बघायला मिळाली नाही. म्हणजे त्यापेक्षा नगरपरिषदच बरी होती असे जनतेचे मत आहे. कारण म.न.पा. येवढा अवाढव्य कर वसूल करीत असून सुध्दा स्वच्छतेच्या नावावर नागरीकांची फसवणूक करतांना दिसत आहे.

ह्याचे कारण असे की काल जयंत टाकीज चौक, आदर्श पेट्रोल पंप, चंद्रपूर ट्रॉफिक ऑफिस परिसर, हींदी सिटी हायस्कुल, साईबाबा मंदिर जवळ, तुकूम परिसरातील मुख्य रस्ता ह्याच्या व्यतिरीक्त रहिवासी परिसरात तलावाचे स्वरुप निर्माण झाले. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे कंत्राट दाराने ह्या वर्षी नाले सफाई कुठेच केली नसल्याचे विदारक दृश्य दिसून येत आहे. ह्यावर लक्ष देणारे मनपाचे अधिकारी डोळे बंद करून मुंग गिळून बसलेले आहे. ह्यामुळे हे सर्व अधिकारी ह्या परिस्थितीला जबाबदार आहे.

किरीट सोमय्या यांना शिवसेनेचे जोडे

सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी आव्हान केले होते की मुंबई मनपा येथील कोणत्याही प्रभागामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यास त्या झोन च्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे पालकमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार ह्यांना विनंती आहे की एकुण सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. कारण हजारो लोकांच्या घरी पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

 

प्रशासनाने पण पाण्याची तीव्रता पाहता तातडीने सर्व शाळांना सकाळी ११ वाजता सुट्टी जाहीर केली पाहिजे होती. परंतु प्रशासन व प्रशासनावर वचक कोणाचा नसल्यामुळे लहान मुलांना व त्यांच्या पालकांना जिव हातात घेऊन आपल्या पाल्यांना वाचविण्याकरीता घराबाहेर पडावे लागले. म्हणून ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार असलेल्या नालेसफाई च्या कंत्राटदाराला ह्या आठवडयात सर्व मनपा क्षेत्रातील सर्व नाले पुनश्च सफाई करण्याचे आदेश देवून स्वच्छ करून घ्यावे. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस चंद्रपूर शहराच्या वतीने मनपा येथे उग्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर शहर जील्हाध्यक्ष राजीव कक्कड युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर विधानसभा अध्यक्ष सुनिल काळे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे महिला कार्याध्यक्ष चारुशिला बारसागडे, विनोद लभाने, संभाजी खेवले, नौशाद सिध्दीकी, कुमार पॉल, राहुल देवतळे, निसार शेख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देण्यात आला.

 

 

वडगाव प्रभाग व शहरात पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान

शासनाने दखल घ्यावी…पप्पू देशमुख

चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये केवळ एका दिवसाच्या पावसाने हाहाकार माजला.वडगाव प्रभागात सुध्दा शेकडो नागरिकांना याचा मोठा फटका बसला.पुराच्या पाण्यात प्रत्यक्ष जाऊन माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी नागरिकांची भेट घेतली.यावेळी पिडित नागरिकांनी देशमुख यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.

या पुरावर नियंत्रण मिळविण्याचा हा उपाय आहे

वडगाव प्रभागातील दत्तनगर नगर, नानाजी नगर,ओम भवन, चांद टेकडी,मित्र नगर, अपेक्षा नगर , साई मंदिर,आंबेडकर भवन,स्नेह नगर,बापट नगर ,विकास केंद्र, गजानन मंदिर,लक्ष्मी नगर, इत्यादी परिसरातील शेकडो घरांमध्ये काल झालेल्या पावसामुळे अचानक पुराचे पाणी आले. अतिशय कमी वेळात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना सामान हलविणे शक्य झाले नाही.

त्यामुळे घरातील बेड,गाद्या, लाकडी फर्निचर, फ्रिज, वॉशिंग मशीन एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य अक्षरश: या पुराच्या पाण्यात बुडाले. गोरगरीब नागरिकांचे धान्य,खाद्यसामुग्री व इतर महत्त्वाचे साहित्य पाण्यात बुडाले. काही घरातील गॅस सिलेंडर पाण्यावर तरंगायला लागले. नानाजी नगर परिसरात 5-6 कार व अनेक दुचाकी वाहने पाण्याखाली बुडाली.

30-40 वर्षांपासून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मोठे पूर बघितले. परंतु मोठ्या पुरात सुद्धा त्यांच्या घरात कधी पाणी शिरले नव्हते. काल मात्र अचानक एका दिवसाच्या पावसाने आलेल्या पुरामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख तसेच जनविकास सेनेचे अक्षय येरगुडे, मनिषा बोबडे, प्रफुल बैरम, गोलू दखणे, नंदू पाहुणे इत्यादी कार्यकर्ते यांनी छाती भर पाण्यामध्ये जाऊन नागरिकांच्या घरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. काल दुपारपासून रात्री 11 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या तसेच पूर पीडित नागरिकांना शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

पुरामुळे संपूर्ण चंद्रपूर शहर तसेच वडगाव प्रभागातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून याची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी जनविकास सेनेतर्फे करण्यात आली आहे.

 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ किशोर जोरगेवार

नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी निधीची घोषणा करण्याची अधिवेशनात बोलतांना केली मागणी

काल मंगळवारी चंद्रपूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसनीचे पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ देण्यात यावे, मदत केंद्र सुरु करण्यात यावे, येथील नाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणासाठी निधीची घोषणा करण्यात यावी अशी मागणी आज पावसाळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

मंगळवारी चंद्रपूर शहरात झालेल्या पावसामुळे बाबूपेठ, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी, जलनगर, रय्यतवारी कॉलरी, महाकाली कॉलरी, नानाजी नगर वडगाव, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, वृदांवन नगर, इंडस्ट्रियल वार्ड, नेहरु नगर, उत्तम नगर, सरकार नगर या भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांच्या घरातील अन्नधान्य पाण्याने खराब झाले आहे. तर अनेक भागात घरांची पडझड झाली आहे. या सर्व परिस्थितीची आमदार जोरगेवार यांनी माहिती घेतली असून अश्या भागांची पाहणी करुन बेघर झालेल्या नागरिकांच्या राहण्याची तात्काळ व्यवस्था करा अशा सूचना त्यांनी मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना केल्या होत्या.

एकाच कुटुंबातील 4 जणांना जिवंत जाळले

दरम्यान आज पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पॉइंट ऑफ इंफॉर्मेशनवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरलेले आहे. घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ जिल्हाधिकारी यांना पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, लोकांना मदत केंद्रात नेण्यात यावे अशी मागणी केली आहे.

सोबतच शहरातील अनेक नाले निमुळते झाले असल्यानेही नाल्यातील पाणी नागरी वस्तीत शिरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी निधीची घोषणा करण्याची मागणीही यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.