नालंदा हे एक नाव नाही, तर जगात भारतीयांची ओळख असल्याचे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य.
राजगिरी; (बिहार)
येथील नालंदा विश्वविद्यालय परिसराच्या नूतनीकरणाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
आयोजित कार्यक्रम प्रसंगी विदेश मंत्री एस जयशंकर, सतरा देशाचे राजदूत प्रामुख्याने उपस्थित आहेत, सन २०१६ मध्ये नालंदाच्या भग्न परिसराला संयुक्त राष्ट्र विरासत स्थान म्हणून घोषित करण्यात आले होते, त्यानंतर सन २०१७ पासून विश्वविद्यालय परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते,
बुधवारी (ता.१९जून) रोजी उदघाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन करतांना त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात शपथ ग्रहण केल्यानंतर पहिल्या दहा दिवसांत नालंदा विश्वविद्यालयात उपस्थिती होण्याचे त्यांना सौभाग्य मिळाले असून हे भारताच्या विकास गतीसाठी एक शुभ संकेत असल्याचे त्यांनी सांगितले. नालंदा केवळ एक नाव नाही तर नालंदा एक ओळख आहे, एक सम्मान आहे. नालंदा एक मूल्य आहे, मंत्र आहे, गौरव आहे, गाथा आहे. नालंदा हे सत्याचे उद्घोष आहे, ते अग्नीच्या ज्वालामध्ये पुस्तकें जरी जाळली असली तरी मात्र ही आगेची ज्वाला ज्ञानाला मिटवू नाही, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनातून म्हटले आहे.
नालंदा विश्वविद्यालयचा फार पुरातन इतिहास असून गेली १६०० वर्षांपूर्वी नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पांचवी शताब्दीमध्ये झाली होती. त्यावेळी देशात नालंदा विश्वविद्यालयाची निर्मिती हे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे आर्कषित केंद्र ठरले होते, संसाधकांच्या नुसार, बाराव्या शताब्दी मध्ये आक्रमणकाऱ्यांकडून हे विश्वविद्यालय नष्ट करण्यात आले होते. त्यापूर्वी ८०० वर्ष या पुरातन विद्यालयल कित्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले होते, विश्वविद्यालयाची स्थापना गुप्त राजवंशाचे कुमार गुप्त प्रथम यांनी केली होती. पांचव्या शताब्दीमध्ये निर्माण पुरात्त्विक नालंदा विश्वविद्यालयात दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असत, त्यासाठी १५०० अध्यापक कार्यरत होते, सर्वाधिक विद्यार्थी आशिया खंडातील देश चीन, कोरिया व जपानवरून येणारे बौद्ध भिक्षु होते. इतिहासकारांच्या मते, चीनी भिक्षु ह्वेनसांग यांनी सातवीं शताब्दी मध्ये नालंदा विश्वविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात नालंदा विश्वविद्यालयाच्या भव्यतेचा उल्लेख केला आहे. नालंदा विश्वविद्यालय बौद्ध धम्माच्या सर्वात महत्वाचा दोन केंद्रातील एक स्थान मानले जाते, नालंदामधून ज्ञान आणि बुद्धिमत्तेचा प्रचार व प्रसारात प्राचीन भारताचे मोठे योगदान असल्याचा पुराव्यानिशी मानल्या गेले आहे.