चंद्रपूर शहरातील IPL सट्टेबाजांचा किंग?

चंद्रपुरातील ipl सट्टेबाजांचा किंग

News34 chandrapur

चंद्रपूर – क्रिकेटचा महासंग्राम आयपीएल च्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली असून दररोज क्रिकेट प्रेमींना अतितटीचे सामने बघायला मिळत आहे. Indian premier league 2023

क्रिकेट प्रेमीसह आयपीएल क्रिकेट हे सट्टेबाजासाठी जणू एक सणचं आहे, या महिन्यात कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात येतो.

देशात जुगार बंदी असली तरी छुप्या पद्धतीने आजही हा कोट्यवधी रुपयांचा जुगार राजरोसपणे सुरू आहे, यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही. Ipl t20 cricket

चंद्रपुरात मागील अनेक वर्षांपासून आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांचे व घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या सट्टेबाजावर 2 वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी कारवाई करीत त्यांचं नेटवर्क उध्वस्त केले होते, त्या आरोपीमध्ये चंद्रपुरातील अनेकांचा सहभाग होता. Cricket betting

पण आयपीएल च्या या नेटवर्क कडे चंद्रपूर पोलिसांचे लक्ष नाही काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.

सट्टेबाजाच्या या बातमीपत्रात आज चंद्रपूर शहरातील निमजे नामक युवक कमिशनवर काम करीत या अवैध धंद्याचा किंग बनला आहे.

भानापेठ मध्ये वास्तव्यास असलेला निमजे आधी 3 टक्के कमिशनवर मामु कडे काम करायचा, या धंद्यात मिळणाऱ्या झटपट पैश्यात त्याला लालूच आली व त्याने मामु कडून स्वतःची आयडी बनवली आणि मग शहरात त्याने अनेकांची ID बनवीत मोठं नेटवर्क उभे केले.

चंद्रपूर शहर नंतर जिल्हा व आता थेट तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्यामध्ये निमजे ने आपले पंटर उभे केले आहे.

धंदा वाढत असल्याने निमजे भानापेठ प्रभागातून थेट विठ्ठल मंदिर भागात वास्तव्यास गेला, वर्षभरापूर्वी निमजे परवानाधारक सावकार बनला आहे.

या धंद्यात सुद्धा त्याने अनेक युक्त्या वापरल्या आहे, अनेक नागरिकांना आयडी बनवून देण्याचं काम त्याने सुरू केले, कस्टमर मॅच मध्ये पैसे हरला तर त्याच्याकडून जमीन, प्लॉट व सोने गहाण ठेवण्याचे काम निमजे ने सुरू केले आहे.

निमजे ने मामु कडून धंदा कमी करीत थेट नागपूर च्या डीलरकडून काम सुरू केले, आता निमजे स्वतः डीलर आयडी बनवीत चंद्रपुरातील आयपीएल सट्टेबाजांचा किंग बनला आहे.

 

या निमजे वर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे,  nice7777fun अश्या वेबसाईट च्या माध्यमातून तो हजारो आयडी चालवीत आहे, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा किंवा चंद्रपूर शहर पोलिसांनी याकडे लक्ष दिल्यास मोठं घबाड उघड होण्याची शक्यता आहे.