मधुमेह व दृष्टिदोष आजाराने ते गेली पाच वर्षांपासून ग्रस्त होत!
एटापल्ली; (गडचिरोली)
नगरपंचायत क्षेत्रातील कृष्णार येथील काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते मनोहर मंगरू हिचामी (वय 62) यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते गेली पाच ते सहा वर्षांपासून मधुमेह व इतर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांची दृष्टी कमजोर झाली होती.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक मनोहर हिचामी यांचा तीन दशकांपूर्वी राजकीय प्रवास सुरू झाला ते १९९४ पासून शिवसेना कार्यकर्ता म्हणून वडेट्टीवार यांच्या सोबत जोडल्या गेले, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असे पदे भूषवून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवलेली आहे स्थानिक सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा मान होता. काही वर्षांपूर्वी त्यांना मधुमेहाचा आजार झाला, यातच त्यांची दृष्टी कमजोर झाली होती, त्यामुळे त्यांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यात खंड पडला. एक आठवड्यापूर्वी मनोहर हिचामी यांची प्रकृती खालावल्याने नातेवाहिकांनी त्यांना एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते. एक आठवडा त्यांच्यावर उपचार केले जात असतांना त्यांना (ता.१० सप्टेंबर) मंगळवारी पहाटे चार वाजता दरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावली व वैद्यकीय उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, मृत्यू पश्चात मनोहर मंगरू हिचामी यांना दोन पत्नी, चार मुले, चार मुलगी, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. मनोहर हिचामी यांच्या दुःखद निधनावर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अंत्यविधी (१० सप्टेंबर) मंगळवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान कृष्णार येथील स्मशानभूमीत केला जाणार आहे.