खासदार डॉ नामदेवराव किरसान यांचे आढावा सभेतून निर्देश,
एटापल्ली;(गडचिरोली)
येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित आढावा सभा प्रसंगी प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकास कामे करतांना नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन सौजन्याने वागावे असे निर्देश देण्यात आले आहे.
यावेळी आढावा घेतांना तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व नूतनिकरणाच्या कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम अभियंता सुनील बावणे यांना देण्यात आले आहेत. आरोग्याच्या समस्या संबधी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन कन्नके तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ तुपेश उईके यांना आरोग्य सेवा सक्षम करून सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा प्रधान करण्याचे सांगितले, पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे यांनाही भोळ्या भाबड्या व निर्दोष जनतेला पोलिसांनी विनाकारण त्रास देऊ नये असे निर्देशित केले आहे. नायब तहसीलदार अनिल भांडेकर यांना नागरिकांची महसूल विभाग अंतर्गत कामे जलदगतीने करण्याचे सांगितले, गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांना रखडलेली घरकुले तथा विविध विकास कामे पूर्ण करण्यावर विशेष उपाययोजना कार्याचे सांगण्यात आले, गटशिक्षणाधिकारी हृषीकेश बुरडकर यांचे कडून शिक्षणाचा आढावा घेतांना रिक्त पदे, जीर्ण इमारती व विविध शैक्षणिक समस्यांवर माहिती घेण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांना वन विभागाच्या जमिनीवर आदिवासी व पारंपरिक निवासी नागरिकांच्या उपजीविकेसाठी कसल्या जाणारी शेती व गोरगरिबांच्या निवासी झोपड्या व घरांवर कोणतीही बेकायदेशीर कारवाही करण्यात येऊ नये असे निर्देश त्यांना देण्यात आले आहे. विज वितरण, कृषी, भूमिअभिलेख, बाल विकास प्रकल्प व शिक्षण विभाग अशा तालुका स्तरावरील विविध विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपण लोकसेवक या भावनेने गोरगरीब, आदिवासी व अविकसित भागाच्या नागरिकांची सेवा करण्याच्या संधीचे सोने करण्याचे आवाहन खासदार डॉ नामदेव किरसान यांनी सांगितले आहे.
यावेळी, उपविभागीय अधिकारी नमन गोयल, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, आदिवासी काँग्रेस आघाडी जिल्हा अध्यक्ष हनुमंतु मडावी, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश गंपावार, नगरसेवक निजान पेंदाम, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा नगरसेविका ताराताई गावडे, नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक किसन हिचामी, नगरसेवक नामदेव हिचामी, प्रज्वल नागुलवार, सरपंच कमल हेडो, सुधाकर गोटा, भाकप सचिव कॉ सचिन मोतकुरवार, शिवसेना तालुका प्रमुख अक्षय पुंगाटी, सतीश मुप्पलवार, लोकनाथ गावडे, अंकित वरगंटीवार, सूरज जक्कोजवार, होहे हेडो, बंडू दोरपेटी, काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.