नगरपंचायत प्रशासन कंत्राटदारावर मेहेरबान? नागरिकांचे आरोग्य धोक्यात,
एटापल्ली;(गडचिरोली)
येथील नगरपंचायतच्या मेहेरबानीने शहरातील नालीतील घाण एक आठवड्यापासून रस्त्यावर काढून टाकलेली आहे. त्यामुळे शहरात घाण पसरून दुर्गंधीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
शहरातील नाल्या सफाई कधीतरी दोन ते तीन वर्षात एखाद्या वेळी केली जात असून कंत्राटदार व नगरपंचायत प्रशासनाच्या साठगाठीतून शहराच्या सोयीसुविधा थातूरमथुर केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी येथील नगरपंचायतचा प्रभार भ्रष्ट आयएएस शुभम गुप्ता यांचेकडे होता, त्या कालावधीपासून या नगरपंचायत प्रशासनात विकास कामे मॅनेज करून कंत्राट देण्याची प्रथा रूढ झाली आहे. त्यामुळे गुप्ता यांच्या कालावधीत जे कंत्राटदार प्रशासनाच्या साठगाठीतून कंत्राट मिळवत होते, तेच कंत्राटदार आजही त्याच पद्धतीने कंत्राट मिळवून नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामे थातूरमथुर करून प्रशासनाच्या संगनमताने विकास निधीवर डल्ला मारतांना दिसून येत आहेत. हे विशेष!
त्यामुळेच नगरपंचायतला शासनाकडून मिळणारा करोडो रुपयेचा विकास निधी केवळ कागदावर नियोजित खर्च दाखवून शहराचा विकास भकास करण्याची शुभम गुप्ता यांनी शिकविलेली कला आजही प्रशासनात काटेकोरपणे अवलंबविली जात आहे. त्यामुळे शहरातील नालीतून रस्त्यावर टाकलेली घाण उचलण्याची व नगरपंचायत प्रशासन व कंत्राटदार यांच्या संगनमताने विकास निधीत होत असलेली लूट थांबवून, गलथान कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाहीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
एक आठवड्यापासून नाल्यांमधून काढून रस्त्यावर टाकलेली घाण संबधीत माहिती घेऊन कंत्राटदाराला उचल करण्यास सांगितले जाईल. असे मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी “जनकत्व” न्युज नेटवर्कशी बोलतांना सांगितले आहे.