चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे क्रिकेट सट्टेबाजांवर धाडसत्र सुरू

चंद्रपूर पोलिसांची दबंग कारवाई

News34 chandrapur

चंद्रपूर – IPL Cricket T20 चा 16 वा हंगाम सध्या जोरात सुरू आहे, स्थानिक गुन्हे शाखेच्या धास्तीने लाईव्ह सामन्या दरम्यान क्रिकेट वर पैश्याची बाजी लावणारे आता दुर्लभ झाले आहे. Ipl betting

क्रिकेट सुरू झाल्यावर सट्टेबाज सुद्धा सक्रिय झाले होते मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करीत जिल्ह्यात सक्रिय असलेले क्रिकेट बुकींचे नेटवर्क उध्वस्त केले. Cricket gambling chandrapur

सतत 6 कारवाया केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा 8 एप्रिलला गोंडपीपरी येथील भंगाराम तळोधी येथे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Delhi Capital) च्या लाईव्ह सामन्या दरम्यान 27 वर्षीय अभिलाष शरद मारगोणवार हा युवक IPL Betting चालविताना आढळून आला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली.

आरोपी अभिलाष जवळून मोबाईल, रोख व इतर साहित्य मिळून 21 हजार 705 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

9 एप्रिलला चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर येथील सिद्धू पान सेंटर मध्ये 30 वर्षीय सिद्धांत माधव गोंडाने रा. राजीव गांधी नगर हा युवक गुजरात टायटन (Gujarat Titans) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर (Kolkata Knight Rider) या लाइव्ह मॅच दरम्यान क्रिकेट सट्टा चालवीत होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने सिद्धांत ला ताब्यात घेत त्याच्या जवळील मोबाईल, रोख व इतर साहित्य असा एकूण 17 हजार 105 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur local crime branch

दोन्ही कारवाईत महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीत पुढील तपास गोंडपीपरी व रामनगर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउपनी अतुल कावळे, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, सुभाष, अनुप, मिलिंद, नितेश, सतीश, मयूर, मिलिंद यांनी केली.