जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक करा – विजय वडेट्टीवार

पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांचा प्रशासनाला इशारा

News34 chandrapur गुरू गुरनुले

 

मूल : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय असून राजकिय नेत्यावर गोळीबार करून जिल्हयात दहशत माजवणारी पहिली घटना आहे. त्यामूळे दहशत माजविण्याचा प्रकार करणा-या आरोपीसोबतचं त्याच्या मुख्य सूत्रधाराचा पोलीसांनी तातडीने छळा लावावा. अन्यथा जिल्हाभर आंदोलन उभारू. असा इशारा माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला. Mla vijay vadettiwar

११ मे रोजी रात्रो ९.२० वाजताचे सुमारास झालेल्या भ्याड हल्ल्यातून सुरक्षीत राहीलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटी प्रसंगी आयोजीत पत्रकार परिषदेत आ. विजय वडेट्टीवार बोलत होते. जिल्हयाच्या इतिहासात एखादया राजकिय नेत्यावर हल्ला होण्याची पहिलीच घटना आहे. धार्मिक आणि सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या संतोषसिंह रावत यांचे जिल्हयात कोणाशीही व्यैयक्तीक वैरत्व नाही, असे असतांना त्यांचेवर पाळत ठेवून गोळी झाडल्या जावी, ही घटना विकृत मानसिकतेचे द्योतक असल्याचे आ. वडेट्टीवार म्हणाले.

संतोष रावत यांचेवर भ्याड हल्ला होवून तीन दिवस झाले, परंतू अद्याप पर्यंत हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही, त्यामूळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून दिवसेंदिवस तिव्र होत आहेत. भविष्यात कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होवू नये म्हणून पोलीस विभागाने सदर प्रकरणाचा तपास करतांना जात, धर्म, पक्ष आणि पद याची तमा न बाळगता आरोपींना पडदयासमोर आणावे, अन्यथा सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्याच्या सहकार्याने जिल्हाभर निषेध सभा, रास्ता रोको आणि बंद पाडू असा इशारा देतांना पहिली निषेध सभा स्थानिक गांधी चौकात घेण्यात येईल. असे सांगीतले.

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीवरून जिल्हयात काॅंग्रेस मजबुत होत असल्याचे दिसून येते, परंतू काही मंडळींना काॅंग्रेसची मजबुती खपत नसल्याने निष्ठावंताचा आवाज दाबण्यासाठी हल्ल्याचा प्रकार केला असावा, अशी शंका व्यक्त करतांना आ. वडेट्टीवार यांनी घडलेला भ्याड हल्ला हा जिल्हयाचे पालकमंत्री यांचे विधानसभा क्षेत्रात घडला. त्यामूळे सदर गंभीर घटनेत पालकमंत्री लक्ष घालतील, अशी अपेक्षा होती. परंतू पालकमंत्री यांनी सदर प्रकरणात आजपर्यंत लक्ष घातल्याचे दिसत नाही, ही बाब खेदजनक असल्यानेे सदर प्रकरणाची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचेकडे तक्रार करणार असल्याचेही आ. वडेट्टीवार यांनी सांगीतले. यावेळी काँग्रेस नेते प्रकाश देवतळे, नंदु नागरकर, गंगाधर वैद्य, सुनिल उनाटकर, राकेश रत्नावार, नितीन उराडे, गुरू गुरनुले, चिञा डांगे, श्यामकांत थेरे, अंबिकाप्रसाद दवे, राजेश अडुर, घनश्याम येनुरकर आदी उपस्थित होते. Santosh rawat firing

रावत यांचे निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषद नंतर आ. विजय वडेट्टीवार यांनी पोलीस स्टेशन मूल येथे जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्र परदेशी यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती झालेल्या निर्णयावर भाष्य करतांना आ. वडेट्टीवार यांनी बुधवार पर्यंत सदर गुन्हयाचा शोध न लागल्यास वरीष्ठ आयपीएस अधिका-याचे नेतृत्वात सदर प्रकरणाचा तपास करून आरोपीला शोधुन काढू. असे आश्वासन दिल्याचे सांगीतले.

प्रकरण गंभीर असून दहशत माजविणारा आहे. त्यामूळे सदर प्रकरणाचा तपासाकरीता जिल्हयात वेगवेगळे पंधरा पथक तयार करण्यांत आले असून विशेष चौकशी पथकाचीही नियुक्ती करण्यांत आली आहे. त्यामूळे येत्या काही दिवसात सदर प्रकरणाचा छळा लागेल. असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्र परदेसी यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.