रेल्वे लाईनचे काम आणि चंद्रपूर-मूल मार्ग बंद

चंद्रपुरातील या मार्गावरून होणारी वाहतूक बंद

News34 chandrapur गुरू गुरनुले

 

मूल – रेल्वे लाईनच्या लेवल क्रासींगच्या कामांमुळे शुक्रवार पासुन तर रविवार पर्यंत रात्रौच्या वेळात चंद्रपूर मार्गामध्ये बदल करण्यात आले असुन याबाबतचे पत्र दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे मंडळ अभियंता (दक्षिण) यांनी मूल पोलीस स्टेशनला दिले आहे, यामुळे मूल पोलीस स्टेशन कडुन पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती मूल पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी कळविले आहे.

दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेच्या मौजा राजोली, मूल, मारोडा दरम्यान रेल्वे लाईनचे लेवल क्रासींगचे काम 8 जुन ते 10 जुन रोजी करण्यात येणार आहे, काम करीत असतांना रात्रौ 8.00 ते सकाळी 8.00 वाजता दरम्यान मुल-चंद्रपूर मुख्य वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येणार आहे.

यामुळे सदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मूल, ताडाळा, चिचाळा, हळदी, दहेगांव, नलेश्वर, चिरोली, जानाळा वरुन चंद्रपूर यामार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ने दिलेल्या पत्रांवये मूल पोलीस स्टेशनच्या वतिने देण्यात आली आहे. यांची सर्व वाहतूक धारकांनी ट्रान्सपोर्ट ट्रक चालकांनी नोंद घ्यावी.