News34 chandrapur

चंद्रपूर – सध्या शहरातील नागरी वस्तीत झपाट्याने वाढ होत आहे, सध्या प्रशासन या बाबीवर विशेष लक्ष देत वाढणाऱ्या नागरी वस्तीमध्ये सोयी सुविधा पुरविण्याबाबत प्रयत्नशील आहे.
एकीकडे नागरी वस्तीत वाढ तर दुसरीकडे वाहनांची वर्दळ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
चंद्रपूर शहर असो वा जिल्हा यंदा मोठ्या अपघातांच्या घटनेत सुद्धा वाढ झाली आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, त्यासोबतच आता महामार्गावर सुद्धा वाहने अतिक्रमण करीत आहे, लोहारा ते मूल मार्गावर याचं जिवंत उदाहरण बघायला मिळत आहे.

मागील वर्षी चीचपल्ली मार्गावर टँकर उलटून 9 जणांचा मृत्यू झाला होता, लोहारा ते मूल या मार्गावर असंख्य हॉटेल्स व बार चं साम्राज्य आहे, मात्र पार्किंग च्या नावाखाली वाहने रस्त्यावर दिसत असतात.

या मार्गावर सकाळच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाई मोहीम सुरू असते मात्र सायंकाळच्या वेळी जेव्हा वाहनांचे अतिक्रमण वाढते त्यावेळी मात्र कारवाई थंड बसत्यात असते.

दारू पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार या मार्गावर मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र पोलीस व वाहतूक प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे की काय? हा प्रश्न ही परिस्थिती बघता उपस्थित होतो.

चंद्रपूर शहराची अस्तव्यस्त वाहतूक बघता राज्य मार्गावर सुद्धा अशीच परिस्थिती आहे, यामधील काहीसा मार्ग हा रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो, पण पोलीस तर सोडा वाहतूक विभाग सुद्धा यावर कारवाई करायला तयार नाही.

लोहारा ते मूल मार्गावर सायंकाळी चारचाकी व दुचाकी चालक वाहन धारक मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी करीत आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावतात, यामुळे या मार्गावर भविष्यात मोठा अपघात टाळता येणार नाही व त्या अपघाताला पोलीस प्रशासन कारणीभूत असेल हे नक्की.

विशेष म्हणजे पोलिसांनी पार्किंग ची परवानगी नाकारलेल्या हॉटेल चालकांनी मुजोरी करीत पुन्हा रस्त्याच्या कडेला वाहने लावण्याचे काम सुरू केली आहे, चीचपल्ली ते लोहारा मार्गावर असणारे हॉटेल्स, बार व धाबे वाहतुकीचे सर्व नियम मोडकळीस काढत आहे, आम्ही प्रशासनाला खिशात घेऊन चालतो त्यामुळे आमचं कुणी काही वाकड करू शकत नाही अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी निर्माण झाली आहे.

पोलीस प्रशासनाने अश्या मुजोर हॉटेल्स, बार व धाबे चालकांवर कारवाई करीत मोठ्या अपघाताची वाट बघू नये, कारण सायंकाळच्या सुमारास दारू पिऊन या मार्गावर अनेक धिंगाणे या मार्गावर नागरिकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.