News34chandrapur
चंद्रपूर – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप सोबत युती करीत चंद्रपूर बाजार समिती निवडणुकीत कांग्रेसने कांग्रेसला हरवीत विजय मिळविला त्यानंतर भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष भोंगळे सोबत कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी विजयी ठेका धरला होता.
खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनल ला हरविण्यासाठी देवतळे यांनी भाजप सोबत युती केली होती, याबाबत त्यांची महाराष्ट्र कांग्रेसकडे तक्रार करण्यात आली, तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र कांग्रेसने देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली.
त्यानंतर ग्रामीण जीलाध्यक्ष पदाचा पदभार शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे देण्यात आला, त्यानंतर 29 मे ला कांग्रेस आमदार सुभाष धोटे यांना कांग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा प्रभारी पदभार देण्यात आला, मात्र त्याच दिवशी केंद्रातील पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांच्या देवतळे बाबत निर्णयाला होल्ड केले होते, देवतळे संदर्भातील निर्णय हा दुपारी पत्राद्वारे आला आणि सायंकाळी सुभाष धोटे यांना पदभार देण्यात आला.
मात्र 23 दिवसानंतर देवतळे संदर्भातील पत्र व्हायरल करण्यात आले, विशेष म्हणजे ते पत्र पक्षांतर्गत होते, गोपनीय पत्राला असे व्हायरल करणे म्हणजे पक्ष शिस्तीचा भंग आहे, कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे चं आहे, देवतळे नाही, पक्षातील काहींनी हे पत्र व्हायरल करीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती कांग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
30 मे ला खासदार धानोरकर यांचं निधन झाल्याने देवतळे संदर्भातील विषय संपला होता मात्र आता ते पत्र व्हायरल करण्यात आले ही गंभीर बाब आहे, आणि विशेष म्हणजे कांग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष मीच आहे अशी प्रतिक्रिया देवतळे यांनी प्रसारमाध्यमात दिली, ही गंभीर बाब असून देवतळे वर कारवाई होणार असे संकेत दत्तात्रय यांनी दिले आहे.
दिल्ली हायकमांडनेते पत्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना दिले होते, त्या पत्राचा आधार घेत मीच जिल्हाध्यक्ष आहे अशी सर्वत्र बाब सध्या देवतळे करीत आहे, त्यांना पक्षातून काढण्यासंदर्भात अनेकांनी तक्रारी केल्या आहे त्याबाबत येत्या 2 दिवसात निर्णय होणार आहे.
आयोजित पत्रकार परिषदेला सतीश वारजूरकर, दिनेश चोखारे, डॉ.झाडे यांची उपस्थिती होती.