चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय चित्र पालटणार

पक्षप्रवेश दिग्गज नेत्यांचा

News34 chandrapur

चंद्रपूर/भद्रावती : वरोरा विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागील विधानसभेचे उमेदवार रमेश राजूरकर हे रविवार, २५ जून रोजी भद्रावती येथील जैन मंदिराच्या सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, पूर्व विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

(alt="chandrapur politics bjp entry")
25 जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गजांचा भाजप पक्षात प्रवेश

 

तसेच विदर्भातील ओबीसी नेतृत्व डॉ. अशोक जीवतोडे यांचा सुद्धा 25 जून रोजी चंद्रपुरातील जनता कॉलेज मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश होणार आहे.

रमेश राजूरकर यांनी आपलं राजकीय कारकिर्दीची सुरुवात मनसे मधून सुरू करीत पहिल्या विधानसभा निवडणुकीत 30 हजारांच्या वर मते घेत प्रस्थापित उमेदवारांना मोठा धक्का दिला होता, मागील 4 वर्षात त्यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात मोठा जनसंपर्क वाढविला, याचा फायदा त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मिळेल यात काही शंका नाही.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समनव्यक डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजप पक्षात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली.

मागील अनेक वर्षांपासून अशोक जीवतोडे ओबीसी चळवळीत सक्रियपणे काम करीत आहे, ओबीसी आरक्षण असो की ओबीसी जनगणना यासाठी ते सतत पाठपुरावा करीत आहे.

जीवतोडे यांच्या प्रवेशाने भाजप पक्षाला मोठा फायदा होणार असे मानले जात आहे. भाजप पक्ष प्रवेशानंतर राज्य व केंद्रातील पक्ष श्रेष्ठींच्या भेटी घेत ओबीसी समाजाला ते न्याय मिळवून देतील यात दुमत नाही.

 

रमेश राजूरकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये नवीन चेहरा मिळाला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील अनेक सरपंच, सहकार सोसायटीचे अध्यक्ष, विविध पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात भद्रावती येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रमेश राजूरकर यांनी भाजपमध्ये जाण्यामागील बाजू स्पष्ट केली.

 

पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे, प्रा. प्रणिता शेंडे, तुळशीराम श्रीरामे, बांगडे प्रवीण सातपुते, पंढरीनाथ पिंपळकर आदींची उपस्थिती होती.
सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविताना अनेक अडचणी येतात. समाजकार्य करताना या अडचणी सोडविण्यासाठी राजकारणाची जोड असणे आवश्यक असल्याचा आपल्याला अनुभव आला आहे.

 

सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर आपला भर आहे. विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याने आपण पक्ष प्रवेश करणार असल्याचे राजूरकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर देशाला ज्या पद्धतीने प्रगतिपथावर आणले, त्यांच्या या कार्याने आपण प्रभावित झालो असून, राज्य तसेच जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आपल्यासोबत अनेक सरपंच, विविध सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

विशेष म्हणजे रमेश राजुरकर व डॉ. अशोक जीवतोडे यांचा पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होत असल्याचे दोघांनी स्पष्ट केले, मात्र जिल्ह्यातील भाजप पक्षातील स्थानिक नेतृत्वाला दोघे डावलत तर नाही न असं संभ्रम भाजप कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.