आमदार जोरगेवारांच्या पाठपुराव्याने पोलीस उपनिरीक्षक पदाची लागली मेरिट लिस्ट

पोलीस उपनिरीक्षकांची मेरिट लिस्ट

News34 chandrapur

चंद्रपूर – 2020 ला पोलिस उपनिरिक्षक पदाकरिता झालेल्या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आलेला नव्हता सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने निकाल जाहिर करण्यात विलंब होत होता.

तलाठी व वनरक्षक भरतीसाठी अर्ज केलायं तर ही बातमी वाचाच

 

परिणामी सदर परिक्षा देणा-या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले होते. त्यामुळे याची दखल घेत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सद्यास्थितीत मेरिट लिस्ट लावण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. या मागणीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असुन पोलीस उपनिरीक्षकांची तात्पुरती मेरीट लिस्ट प्रकाशित केली आहे.

चंद्रपुरात मोबाईल स्नॅचिंग, 2 तासात पोलिसांची कारवाई

       मार्च 2020 ला राज्य शासनाच्या वतीने पोलिस उपनिरिक्षक पदाकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली पूर्व परीक्षा घेण्याकरिता कोरोना महामारी व मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या कारणामुळे उशीर झाला. त्यानंतर पूर्व मुख्य,  शारीरिक चाचणी व मुलाखत संपन्न झाल्यात. परंतु जाहिरातीच्या वेळी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्य शासनाने शासन निर्णय काढून एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुला प्रवर्ग किंवा पात्र असल्यास ई डब्लु एस प्रवर्गात अर्ज सुधारणा करण्याचा शासन निर्णय प्रकाशित केला. परंतु या शासन निर्णयाविरुद्ध काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणाकडे धाव घेतली त्यानंतर सदर शासन निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणे रद्द केला.

चंद्रपूर जिल्ह्यात खतांची अवैध साठवणूक, भरारी पथकाची धाड

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासन उच्च न्यायालयात गेले. त्यामुळे हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

 परिणामी या परीक्षेचा अंतिम निकाल राखून ठेवलेला होता. निकाल प्रलंबित असल्यामुळे सदर उमेदवारांपूढे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच 2021 व 2022 ची भरती प्रक्रिया सुद्धा त्यामुळे प्रलंबित राहिलेली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सद्यास्थितीत तात्पुरती मेरिट लिस्ट लावण्यात यावी आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय येईल त्यावेळेस प्रोव्हिजनल व अंतिम निकाल जाहिर करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई  मंत्रालयात भेट घेऊन केली होती. या मागणीचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावाही सुरु होता.

 

अखेर या पाठपूराव्याला यश आले असुन 2020 भरती प्रक्रियेतील पोलीस उपनिरीक्षकांची तात्पुरती मेरीट लिस्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.