मुक्कामी राहणे, एक वेळचे भोजनाची मोफत व्यवस्था!
गडचिरोली;
जिल्हा प्रशासनाच्या वतीने
घेतल्या जाणाऱ्या पोलीस भरती शारीरिक चाचणी प्रक्रिया दरम्यान राज्यभरातून शहरात दाखल होणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या मुक्कामी राहण्याची व एक वेळच्या भोजनाची मोफत व्यवस्था सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव च्यावतीने केल्याची माहिती संस्थेचे सूरज कोडपे व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
बुधवार (ता १९जून) पासून गडचिरोली जिल्हा मुख्यालयात पोलीस भरती शारीरिक चाचणी परीक्षा प्रारंभ केली जाणार आहे त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो विद्यार्थी शहरात दाखल होणार आहेत, यात अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या सृष्टीने सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था नवेगावच्या वतील सेलिब्रेशन हॉल, सेमाना बायपास रोड, संजीवनी शाळे जवळ नवेगाव जिल्हा सत्र न्यायालय ते सेमाना मार्गावर राहण्याची व सायंकाळी एक वेळच्या भोजनाची मोफत व्यवस्था केलेली आहे, ज्या गरीब, गरजू विद्यार्थी, विद्यार्थीना सेवेचा लाभ घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वापरासाठीच्या आवश्यक साहित्यासह, परीक्षेचे हॉल तिकीट झेरॉक्स प्रत व आधारकार्ड आदी ओळख पत्रे घेऊन 7821046824, 9420756609, 9405872397, 9766583161 या संस्था पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून नोंदणी करण्याचे आवाहन सूरज कोडपे, जुमनाके, आत्राम, व दुर्गे यांनी केले आहे.