नगरपंचायत प्रांगणात दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी तांबे यांच्या हस्ते फडकला तिरंगा!

“जनकत्व न्युजचा दणका”

सार्वजनिक बांधकाम व ग्रामीण रुग्णालयाची मुजोरी कायम,

एटापल्ली;(गडचिरोली)
घरोघरी तिरंगा अधियान अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या प्रांगणात तीन दिवस ध्वजारोहन कार्यक्रम आयोजन करणे क्रमप्राप्त असतांना, एटापल्ली नगरपंचायत प्रशासनाने पहिल्या दिवशी तिरंगा ध्वजाचे धजारोहन करणे टाळले होते, तर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व ग्रामीण रुग्णालयातही ध्वजारोहण करण्यात आले नव्हते. सदर प्रकारची बातमी जनकत्व न्युज नेटवर्कने प्रकाशित करताच नगरपंचायत प्रशासन खळबळून जागे होऊन दुसऱ्या दिवशी (ता.१४ ऑगस्ट) बुधवारी सकाळी ०८:३० वाजता दरम्यान मुख्याधिकारी प्रणय तांबे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची मुजोरी कायम असून या दोन्ही कार्यालयात दुसऱ्या दिवशीही ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेने जनतेच्या मनात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कायम राहून देश प्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी, या हेतूने सन २०२२ पासून त्रिदिवशीय स्वातंत्र्य महोत्सव साजरा करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपआपल्या घरावर तसेच प्रत्येक शासकीय कार्यालय प्रांगणात दिनांक १३ ऑगस्ट, १४ ऑगस्ट व १५ ऑगस्ट असे ध्वजारोहण करण्याचे शासकीय परिपत्रक आहे. त्यामुळे तालुक्यातील तहसील कार्यालयासह विविध शासकीय तथा निमशासकीय कार्यालये, विविध शाळा महाविद्यालय प्रांगणात (ता.१३ ऑगस्ट) मंगळवार व (ता.१४ ऑगस्ट) बुधवारी सकाळी ०७ ते ०९ वाजताच्या दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व ग्रामीण रुग्णालय प्रशासनातील हेकेखोर अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे घरोघरी तिरंगा अभियानाला हळताड फासल्या गेल्याचे दिसून येत आहे. एटापल्ली तालुका नक्षल प्रभावी असून गेली पाच दशकांपासून या भागात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम ध्वजारोहणास नक्षल्यांकडून तीव्र विरोधात काळे ध्वज फडकवून निषेध नोंदविण्याची परंपरा आहे. हे विशेष!

अशा प्रकारामुळे स्वातंत्र्य दिन महोत्सवाचे महत्व धूसर केल्या गेले आहे. असे म्हणणे वावगे ठरू नये. यातून देशविरोधी तत्वांना बळ मिळण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण रुग्णालय प्रशासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण न घेण्याच्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

तीन दिवशीय स्वातंत्र्य महोत्सव साजरा करण्याचे व ग्रामीण रुग्णालय प्रांगणात ध्वजारोहण करण्याचे कोणतेही परिपत्रक अथवा सूचना वरिष्ठांकडून नसल्यामुळे १३ ऑगस्ट व १४ ऑगस्ट अशी दोन्ही दिवस ग्रामीण रुग्णालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम घेतले नाहीत. असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुपेश उईके यांनी जनकत्व न्युजशी बोलतांना सांगितले आहे. सार्वजनिक बांधकाम अभियंता सुनील बावणे यांनी स्वातंत्र्य दिन महोत्सव संबधी त्रिदिवशीय ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यासंबधी मला काहीही कल्पना नाही. हीच त्यांनी पहिल्या दिवशी दिलेली प्रतिक्रिया आज कायम ठेवली आहे.