एटापल्ली तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा,

शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण,

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय व सामाजिक संस्थाच्या प्रांगणात राष्ट्रीय तिरंगा ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य दिन कार्यक्रम प्रसंगी तहसील कार्यालय प्रांगणात तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांचे हस्ते, पंचायत समिती आवारात गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांचे हस्ते, नगरपंचायत कार्यालयमध्ये प्रशासक हेमंत गांगुर्डे यांचे हस्ते, जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिमेश बिश्वास यांच्या हस्ते, ग्रामपंचायत तोडसा सरपंच वनिता कोरमी यांचे हस्ते, ग्रामपंचायत गट्टा सरपंच पूनम लेकामी यांचे हस्ते, ग्रामपंचायत जांबिया गीता हिचामी, ग्रामपंचायत गुरूपल्ली व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवेली येथे सरपंच कैलास उसेंडी यांचे हस्ते, ग्रामपंचायत नागुलवाडी सरपंच नेवलु गावडे, ग्रामपंचायत पुरसलगोंदी सरपंच अरुणा सडमेक, ग्रामपंचायत हालेवारा सरपंच नीलिमा गोटा, ग्रामपंचायत गेदा सरपंच हिना मडावी, ग्रामपंचायत कसनसुर सरपंच कमल हेडो, ग्रामपंचायत जारावंडी सरपंच सपना कोडापे, ग्रामपंचायत घोटसुर सरपंच साधू कोरामी, ग्रामपंचायत मानेवारा सरपंच मनकु नरोटे, ग्रामपंचायत येमली सरपंच ललिता मडावी, ग्रामपंचायत उडेरा सरपंच गणेश गोटा, ग्रामपंचायत बुर्गी सरपंच विलास गावडे, ग्रामपंचायत सरखेडा सरपंच वर्षा उसेंडी, ग्रामपंचायत कोटमी सरपंच सिंधू मोहंदा, ग्रामपंचायत वाघेझरी सरपंच विलास कोंदामी, ग्रामपंचायत जवेली सरपंच मुन्ना पुंगाटी यांचे हस्ते, ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे,

यावेळी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नायब तहसीलदार अनिल भांडेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर गव्हाने, गटशिक्षणाधिकारी हृषीकेश बुरांडे, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे, प्राचार्य विनय चव्हाण, मुख्याध्यापक श्रीनिवास पुल्लूरवार, निर्मला देवतळे, उपसरपंच राजू नरोटे, प्रशांत आत्राम, देवीदास मट्टामी, देऊ पुंगाटी, किशोर हिचामी, मंगेश पुंगाटी, ग्रामसेवक नरेश मडावी, राजेंद्र शेंडे, दिवाकर निंबेकार, जयश्री कुळसंगे, संध्या गेडाम, कपूर डेरीया, लता मडावी, राजेश बाटवे, मारोती खरात, मनोज गेडाम, सुनील धकाते, रामचंद्र कोडपे, वसंत पवार, प्रदीप बेलखेडे, प्रशासकीय अधिकारी, शासकीय पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,