चंद्रपुरात WCL च्या CSR निधीचा वाद, मनसेने केला गंभीर आरोप

मनसेचा गंभीर आरोप

News34 chandrapur

चंद्रपूर – व्यवसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजेच CSR Fund कम्पनी कायदा 2013 मध्ये खाजगी क्षेत्रातील कंपन्या आपल्या नफ्यातून काही भाग बाजूला काढून ठेवतात, सामाजिक जबाबदारी म्हणून ह्या निधीतून काही भाग समाजपयोगी कार्यात लावल्या जातो,  या कार्यामध्ये विविध गोष्टी केल्या जाऊ शकतात, जसे गरीब मुला-मुलींसाठी शिक्षण उपलब्ध करणे, पाणी, रस्ते, कपडे आणि अन्य बाबी. सामान्य वक्ती साठी सामाजिक जबाबदारी असते तसेच कॉर्पोरेट कंपन्यांसाठी Corporate Social Responsibility लागू होते.
मात्र चंद्रपुरात WCL च्या CSR निधीचा बेकायदेशीर वापर झाला असल्याचा आरोप मनसेच्या विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष एडवोकेट मंजू लेडांगे यांनी केला आहे, 10 एप्रिलला चंद्रपुरातील चांदा पब्लिक स्कुल या खाजगी शाळेला खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने 30 संगणक व 2 प्रिंटर CSR निधीतून देण्यात आले, यावेळी वेकोली महाप्रबंधक संजय वैरागडे यांचीही उपस्थिती होती.
चांदा पब्लिक स्कुल ही खाजगी शाळा असून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया दरम्यान अवाजवी शुल्क आकारण्यात येते, मात्र csr फ़ंडातून खाजगी शाळेला संगणक दिल्यावर काय फायदा झाला? कारण त्या शाळेत गोर-गरिबांची मुले शिक्षण घेत नाही.
तर त्याना त्या निधीतून संगणक दिल्याने किती गोरगरीब विद्यार्थ्यांचा फायदा झाला? असा सवाल लेडांगे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत मंजू लेडांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की कम्पनी कायदा 2013 च्या कलम 135 च्या कोणत्या नियमानुसार व कुणाच्या शिफारशींवर सदर निधी शाळेवर संगणकाच्या माध्यमातून खर्च करण्यात आला.
आम्ही मुख्य महाप्रबंधक वेकोली चंद्रपूर संजय वैरागडे त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी 2 ते 3 दिवसात आम्ही नेमकी माहिती आमच्यासमोर सादर करणार असल्याचे सांगितले, जर माहिती मिळाली नाही तर आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून दाद मागावी लागेल, व आम्ही याबाबत दाद मागू, सदर निधीची ज्यांना खर गरज आहे त्यांना यापासून वंचित करण्यात आले आहे.
वेकोली चे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मनसेचे शिष्टमंडळ मला त्या csr निधींबाबत विचारणा केली आहे, त्यांना मी 3 दिवसांचा वेळ मागितला असून त्यांना मी सविस्तर माहिती देणार आहो.
CSR निधीच्या या मुद्द्यावरून प्रथमचं मनसेच्या मंजू लेडांगे व वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे आमने-सामने आले आहे, जर csr निधीचा बेकायदेशीर वापर झाला असेल तर ती गंभीर बाब आहे. मनसेच्या या प्रश्नावर वेकोली काय खुलासा सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.