साई मुर्ती स्थापनेला 20 वर्षे पूर्ण, महाप्रसादाचे वाटप

बसस्थांनक हनुमान मंदिर मुल येथे साई मूर्ती स्थापन दिवस निमित्त महाप्रसादाचे वाटप

News34 chandrapur  गुरू गुरनुले

 

मुल – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष,माजी जी.प.अध्यक्ष तथा हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मातोश्री कमलादेवी चंदनसिंह रावत यांचे स्मृती प्रित्यर्थ बस स्थानक मुल येथे जिर्णोद्धार केलेल्या हनुमान मंदिरात साई मूर्ती स्थापनेला २० वर्ष पूर्ण झाल्याने आज ११ जून २०२३ रोज रविवारला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री.साई भक्ती सेवा समिती मुल तर्फे संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली मूर्ती अभिषेक,भजन काला, साई पालखी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले.

या निमित्त मुल नगरातील भक्तजनांना व बस स्थानक येथे जाणाऱ्या येणाऱ्या हजारो प्रवाशी बांधवांना महाप्रसाद व जीलेबीचे वाटप स्वतः संतोषसिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, संघटक विवेक मुत्यलवार, अध्यक्ष राजू करपे, तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, उपाध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव विष्णू सादमवार, कोषाध्यक्ष केशव गुज्जनवार, कार्यवाह नवाब पठाण, सहसचिव विजू वदे, संजय टिकले, यांचेसह साई भक्ती सेवा समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मदत केली.

स्थापना दिवस आयोजनासाठी समितीचे सदस्य संदीप कारमवार, राजेंद्र कन्नमवार, गणेश पडगेलवार,नीलेश राय, वासुदेव दिघोरे, प्रशांत नंदीग्रामवार, प्रथम रेगुंडवार, सुमित गुडलावर,रमेश चीलके, प्रेमसेठ चुगानी,पी.एम. रक्षमवार, अभिजित चेपुरवार,मनोज गुज्जनवार बादल करपे, लवणिष उधवाणी,सुमित नैताम,रणजित समर्थ, सागर वत्तमवार इत्यादींनी परिश्रम घेतले.