चंद्रपुरात प्रतिबंधित प्लॅस्टिक चा मोठा साठा जप्त

प्रतिबंधित प्लॅस्टिक चा मोठा साठा जप्त

News34 chandrapur

चंद्रपूर – केंद्र व राज्य सरकारने प्लॅस्टिक प्रतिबंध केल्यावर सुद्धा आज अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने प्लॅस्टिक चा व्यापार सुरू आहे. अशीच आज शिवसेना युवासेनेने चंद्रपूर मनपाला सूचित केल्यावर मनपाने प्रतिबंधित प्लॅस्टिक चे मोठे घबाड जप्त केले.

 

राज्यात आज माजी पर्यावरण मंत्री, आमदार युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असताना चंद्रपूर युवासेनेने पर्यावरणाला हानी पोहचविणाऱ्या प्लॅस्टिकचा मोठा साठा मनपाला जप्त करण्यास सहकार्य केले.

शहरातील बागला चौक परिसरात असणाऱ्या कोठारी बंगल्याजवळील गोदामात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लॅस्टिक चा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांना मिळाली, त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपता घेत आपल्या कार्यकर्त्यांसमवेत त्या गोदामावर धाड मारली.

त्या गोदामात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लॅस्टिक चा साठा युवासेनेच्या हाती लागला, याबाबत त्यांनी तात्काळ मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना माहिती दिली, क्षणाचाही विलंब न करता आयुक्त पालिवाल यांनी उपद्रव पथकाला त्याठिकाणी पाठविले.

 

कोठारी यांचे गोडाऊन मधे ठेवण्यात आलेल्या आशापूरी यावर पथकाने कारवाई करून रू.25000/- दंड वसूल करण्यात येणार आहे. गोदामात तब्बल 3 हजार 150 किलो चा प्रतिबंधित प्लॅस्टिक चा साठा मनपाच्या पथकाने जप्त केला.

 

ही कारवाई विपिन पालीवाल आयुक्त,  चंदन पाटिल अति. आयुक्त, अशोक गराटे उपायुक्त यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार, कर्मचारी अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव, डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व उपजिल्हाप्रमुख रिजवान शेख, शहर प्रमुख शिवा वझरकर व कार्यकर्त्यांनी आयुक्त पालिवाल यांचे आभार मानले.