मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

News34 chandrapur

चंद्रपूर –  राजसाहेब ठाकरे ह्यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त दाताळा येथील म्हाडा कॉलोनी मधील परिसरात 55 झाडे लावण्यात आली. तसेच शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आली.

तसेच राजसाहेब यांना यश, दीर्घायुष्य व उदंड निरोगी आयुष्य लाभो यासाठी माता महाकाली चरणी यज्ञ करून प्रार्थना करण्यात आली.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, व्यापारी मनसे जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, विधी सेल जिल्हाध्यक्षा मंजू लेडांगे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह, जील्हासचिव किशोर मडगुलवार, मनोज तांबेकर, विवेक धोटे, महेश वासलवार, प्रकाश नागरकर, नितीन टेकाम, युगल ठेंगे, अक्षय चौधरी, करण नायर, गोलुभाऊ शेंडे, मयूर मदणकर,कार्तिक खंगार, चैतन्य सदाफळे, कृष्णा गुप्ता, प्रवीण शेवते, सचिन बाळस्कर, विजय तूर्क्याल, राकेश बोरीकर, अमित बेले, विकी गुरूनुले,वर्षा बोमले व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.