चंद्रपुरातील सिपेट ने दिली 3 लाखांच्या पॅकेजची नोकरी

30 प्रशिक्षणार्थी यांना नियुक्ती पत्र

News34 chandrapur

 

चंद्रपूर- मोदी@9 महाजनसंपर्क अभियान कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील आपल्या दोन दिवसांच्या व्यस्त कार्यक्रमात केंद्रीय कामगार, रोजगार, पर्यावरण व वने मंत्री भुपेंदर यादव यांनी चंद्रपूर स्थित सेंट्रल इंन्स्टिटयूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरींग अॅड टेक्नोलॉजी (सीपेट) संस्थेस भेट दिली व येथील अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती घेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थित होते.

(alt="cipet institute chandrapur")
सिपेट मधील प्रशिक्षणार्थी यांना केंद्रीय मंत्री यादव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप

दि. 24 जून 2023 रोजी केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव व हंसराज अहीर यांचे सिपेट संस्थेचे निर्देशक आवनितकुमार जोशी यांनी स्वागत केले. केंद्रीय मंत्री महोदयांना या संस्थेद्वारा माहिती देतांना जोशी यांनी सीपेटच्या उभारणीत तत्कालिन रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मौलीक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते 11 डिसेंबर, 2022 रोजी या इमारतीचे लोकार्पण झाल्याचे सांगीतले.

 

चंद्रपूर येथील सिपेटमधून आजपावेतो 2969 युवक-युवतींनी रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेतले त्यापैकी 2507 प्रशिक्षणार्थ्यांना विविध प्लॅस्टीक उद्योगात रोजगार प्राप्त झाला, महाज्योती संस्थेमार्फत विदर्भातील 2000 ओबीसी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मंजुर असून त्याअंतर्गत 76 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, उर्वरित ओबीसी युवकांना लवकरच प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करण्याचे सांगीतले.

 

यावेळी मंत्री महोदयांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. 30 प्रशिक्षीत विद्यार्थ्यांना रेनाटा प्रिसिशन कंपोनेंट या कंपनीमध्ये कॅम्पस सिलेक्शनद्वारा रोजगार मिळाल्याने या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली. यावेळी येथील डिप्लोमाप्राप्त विद्यार्थी फुजेल खान यांनी ‘यनफेंग इंडिया’ या नामांकीत एमएनसी कंपनीत वार्षिक 3 लाख पॅकेजची नोकरी मिळाल्याबद्दल यावेळी मनोगत व्यक्त केले.

 

सीपेट मध्ये महिंद्रा कंपनीच्या वाहनांचे विविध पार्टस, कुलर, इलेक्ट्रीकल, उपकरणे व अन्य प्लॅस्टीक वस्तूंची निर्मीती होत असल्याबाबत मंत्री महोदय व मान्यवरांनी समाधान व्यक्त करीत सीपेट टिम ला शुभेच्छा दिल्या.