अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी

अजित पवार पुन्हा पॉवर मध्ये

News34

चंद्रपूर / मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांची साथ मिळाल्यावर त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली मात्र शपथ देण्यात आलेल्या मंत्र्यांना खात द्यायचं तरी कोणतं? यावर अनेक दिवसांपासून विचारमंथन सुरू होते, आज तो तिढा सुटला असून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची खाते जाहीर करण्यात आली आहे.

Ajit pawar finance minister

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ व नियोजन, धनंजय मुंडे – कृषी, दिलीप वळसे पाटील यांना सहकार, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, धर्मराव बाबा आत्राम – अन्न व औषध प्रशासन, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण, अनिल पाटील मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, अदिती तटकरे महिला व बालकल्याण, संजय बनसोडे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे हे खाते देण्यात आले आहे.

अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाचा विरोध होता, मात्र अनेक बैठकीनंतर अजित पवार यांना अर्थमंत्री पद देण्यात आले.

इतर मंत्र्यांकडे ही खाती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांतदादा पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत- उद्योग

तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता