चंद्रपूर जिल्ह्यातील IPL सट्टेबाजांवर कारवाई

IPL सट्टेबाजांवर कारवाई

News34 chandrapur

चंद्रपूर – News34 च्या बातमी नंतर चंद्रपूर पोलीस एक्शन मोड मध्ये आली असून मागील 4 दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल सट्टेबाजावर कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे.

तुकुम येथे पडगीलवार नामक आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या लहान बुकीला अटक केली मात्र दुसरा आरोपी अविनाश हांडे हा पसार झाला.

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने पडोली, रामनगर व भद्रावती हद्दीत आयपीएल सट्टेबाजावर कारवाई केली आहे, या कारवाईत 3 आरोपीना अटक करीत 93 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मागील आठवड्याभरा पासून News34 ने सतत आयपीएल सट्टेबाजांच्या नेटवर्क व त्यांच्या अवैध धंद्याबाबत वृत्त प्रसारित केले होते, काही दिवसांनी का होईना कारवाईचे धाड सत्र सुरू केले.

पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या यशवंतनगर येथील MH34 पानठेला चालक जुगल हिरालाल लोया हे इंडियन प्रीमिअर लीग च्या हैद्राबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंटस या सामन्यावर पैशे लावत हारजित चा खेळ खेळत होते.

लोया हे मोबाईल द्वारे संभाषण व मॅसेज करून आकडे लिहत असताना स्थानिक गुन्हे शाखेने त्याठिकाणी धाड मारली व लोया यांना रंगेहात अटक केली मात्र कारवाई आधी दुसरा आरोपी पारस उकाड हा पसार झाला.

पारस हा महेश व राजीक यांचा मुख्य पंटर आहे.

पुढच्या कारवाईत सुद्धा रयतवारी कॉलरी येथील CRC Ground समोर सिद्धार्थ कुरमी व भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चारगाव येथे मंगेश दुरुडकर याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली.

तिन्ही कारवाई आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहे.

Ipl cricket सुरू झाल्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातील मुख्य बुकीं सिराज व चंद्रपुरातील त्याचे मुख्य पंटर राजीक व महेश हे अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाही हे विशेष.

मुख्य बुकीं सिराज ने nice pro, 7777 या विविध प्रकारच्या आयडी बनवीत दोघांना या कामाची जबाबदारी सोपविली आहे. स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करीत आहे मात्र मोठ्या बुकींना या कारवाई पासून दूर का ठेवले आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.

News34 च्या बातमीनंतर महेश व राजीक हे भूमिगत झाले असल्याची माहिती मिळाली आहे, आपल्या पंटर ला IPL ची जबाबदारी देत ते तेलंगाणा येथे गेले आहे.

गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी आयपीएल सट्टेबाजांचे नेटवर्क उध्वस्त करीत नागपूर जिल्ह्यातील सट्टेबाजांना अद्दल घडविली होती, या धर्तीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार सदर कारवाई करीत सिराज चे नेटवर्क उध्वस्त करणार काय? ही तर येणारी वेळच सांगेल.

वर्षभरापूर्वी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मोठा बुकीं जम्मू याला घुगुस शहरातून अटक केली होती.

जर आयपीएल सट्टेबाजांचे नेटवर्क उध्वस्त करायचे असेल तर उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी सारख्या अधिकाऱ्यांना कारवाईची जबाबदारी सोपवायला हवी.