भरसभेत सुषमा अंधारे म्हणाल्या चोर आले चोर आले

बहुजन समता पर्व चंद्रपूर

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरात 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत सुरू असलेल्या बहुजन समता पर्व कार्यक्रमात 12 एप्रिलला वक्ता म्हणून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हजेरी लावत, सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकत सरकारवर निशाणा साधला. Bahujan samta parv

सध्या राज्यातील रॅपर वर कारवाईमुळे शिंदे-फडणवीस सरकार चर्चेत आले, मुंगासे यांनी गायलेल्या रॅप मध्ये कुणाचही नाव घेतलेले नाही, मात्र सरकार ने ते रॅप स्वतःवर घेत त्या रॅपर वर कारवाई करण्याचा पराक्रम करून टाकला. Raper raj mungase

 

चोर आले चोर आले, खोके घेऊन चोर आले, असं रैप राज मुंगासे या मुलांन गायल. त्यानं कुणाचही नाव घेतलं नाही. त्याला बोलायचा अधिकार आहे. त्याचावर गुन्हा दाखल झाला. चोर के दाडी मे तीनका बोला है, चोर अपनी दाडी टटोलेगा, जो शरीफ है, वो क्यू दाडी टटोले रहे है, क्या दाडी टटोलनेवाले चोर है, असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधारे यांनी टोला लगावला. 50 khoke ekdam ok

वर्ष 2024 मध्ये होणारी निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक होऊ शकते, मतदार सुज्ञ आहे पुढच्या पिढीचा विचार करून निर्णय घ्या अन्यथा 2024 नंतर राज्यात हुकूमशाहीचे वारे वाहू लागणार.