युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप कार्यक्रम संपन्न

फळ वाटप कार्यक्रम संपन्न

News34 chandrapur

गुरू गुरनुले
मुल – महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा ३३ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यांचा वाढदिवसा निमित्याने मुल ग्रामीण रुग्णालय येथे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांचे मार्गदर्शनात तथा तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे प्रमुख उपस्थितीत युवासेना ( ठाकरे ) गटा तर्फे फळ वाटप करीत वाढदिवस साजरा केला.

फळ वाटप कार्यक्रम मुल युवासेना शहर प्रमुख अमित आयालानी यांचे नेतृत्वात रीतिक संगमवार युवासेना तालुका प्रमुख यांचं पुढाकाराने मुल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.सदर कार्यक्रमात माजी तालुका प्रमुख सुनील काळे, सागर गावतुरे,वैभव इटकलावार,अरविंद सोनटक्के, निलेश तीवाडे,विजय तींगुसले,तोहिड शेख, सौरव गिरडकर,सोहेब पठाण,साहिल पेंदोर आदी युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.