आमदार विजय वडेट्टीवार यांच्या जन्म गावातील तलाव फुटला

आमदार विजय वडेट्टीवार पोहचले जन्मगावी

News34

गोंडपीपरी – गावालगत तलाव फुटल्याने राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या जन्म गावी करंजी येथे पूर येऊन अनेक घरे क्षतीग्रस्त झाली.

ही घटना माहिती पडतात पावसाळी अधिवेशनात जन्म गावाची व्यथा मांडत लगेच दुसऱ्या दिवशी आज शनिवारी थेट जन्मगाव वाटून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी करंजी गावातील नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देत लवकरच घरकुल योजनेअंतर्गत नवीन घरी मिळवून देणार असे आश्वासन देऊन जल संकटातील नागरिकांचे अश्रू पुसले.

आज पूर परिस्थितीचा आढावा घेणे हेतू राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) चे अध्यक्ष त्याचा राजुराचे आमदार सुभाष धोटे , चंद्रपूर काँग्रेसचे नंदू नागरकर , प्रमोद बोरीकर, प्रवीण लांडगे रमेश शेख, सचिन कत्याल ,संदीप सिडाम ,दौलत चालखुरे, परभणी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तुकाराम झाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ तुकेश वानोडे ,कार्याध्यक्ष निलेश संगमवार ,उपाध्यक्ष नितेश मेश्राम, महेंद्र कुंघाटकर, नगरसेवक सुनील संकुलवार, शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडुरवार माजी तालुकाप्रमुख संजय माडुरवार यांचे सह जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर व करंजी या गावांना भेट देण्यात आली.
यावेळी व्हाट्सअप वर येथील भेटी दरम्यान शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत व उध्वस्त झालेले शेतकरी तसेच फुटलेले दोन्ही तलावाचे पाहणी करून या संदर्भात लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन आपण शासन स्तरावर ही आग्रही मागणी मांडणार तसेच शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसानी करिता शासन दरबारी मागणी रेटून धरणार असे आश्वासन यावेळी माजी मंत्री आ.वडेट्टीवार यांनी दिले. तर करंजी या जन्मगावी भेट देताना प्रत्येक क्षतीग्रस्त घरांना भेट देत नागरिकांची व्यथा जाणून घेऊन आपत्तीग्रस्त 25 कुटुंबीयांना कडून एक मदत देत या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करून लवकरच नवीन घरे मंजूर करून देणार असे वचन रुपी आश्वासन देत आपत्तीग्रस्त नागरिकांचे अश्रू पुसत करंजीपुत्र माजी मंत्री आ. वडेट्टीवार करंजी वासीयांचे सांत्वन केले.
उपस्थित अधिकाऱ्यांना उदभवण्यात आलेली पूर परिस्थिती व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना ही बाब गांभीर्याने घेऊन त्वरित तलाव दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. जन्मभूमीचे ऋण हे कधीही पूर्णतः फेडता येत नसले तरी मात्र जेव्हा केव्हा जन्मभूमीवर संकटी येतील तेव्हा मदतीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत धावून येणार अशी ग्वाही देखील माजी मंत्री, काँग्रेस नेते ,आ. वडेट्टीवार यांनी दिली.