चंद्रपूर युवासेनेचे महापरिवर्तन अभियान

आगामी निवडणुकांवर चर्चा

News34

चंद्रपूर –  शिवसेना, युवासेनेला अधिक बळकट करण्यासाठी व समोरील निवडणूकीची रणनीती आखण्यासाठी युवासेनेच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक स्थानिक चंद्रपूर शहरातील रामनगर येथील सिंधी पंचायत सभागृह येथे पार पडली.

हे अभियान पूर्व विदर्भात राबविण्यात येणार असून या बाबतची माहिती युवासेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिली..

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे हे होते,त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा केली.

महाराष्ट्र युवासेनेच्या सहसचिव रोहिनीताई पाटील व युवासेनेचे विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला मंचावर युवासेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शालीक फाले, कुसुमताई उद्गार, विनय धोबे, अमन अंदेवार हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित अग्रवाल,रिजवान पठाण उपजिल्हा प्रमुख युवासेना,शिवा वझरकर शहरप्रमुख, शहबाज शेख उपशहरप्रमुख , संघदीप रामटेके उपशहर प्रमुख युवासेना, नरेश वासनिक उपशहर प्रमुख युवा सेना, व इतर युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत केली व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला..