Welcome To Lohara नियम धाब्यावर, पोलीस पार्किंगमध्ये? कारवाई करणार कोण?

बघा हे विदारक चित्र

News34 chandrapur

चंद्रपूर – 11 जून ला News34 ने शहरातील लोहारा ते चीचपल्ली मार्गावरील वाहनांचे अतिक्रमण बाबत वृत्त प्रसारित केले होते, आता त्या बातमीच्या संदर्भातील वृत्त व्हिडीओ सहित आम्ही प्रकाशित करीत आहो, म्हणजेच या मार्गावर वाहतूक करणारे नागरिक आपला जीव कसा धोक्यात टाकून प्रवास करतात हे आपल्याला नक्कीच समजेल.

सायंकाळचे 6 वाजले की लोहारा ते चीचपल्ली हा मार्ग वाहनांच्या गर्दीने नाहीसा होतो, या मार्गावर काही वर्षांपूर्वी टँकर च्या अपघातात तब्बल 9 जण जळून राख झाले होते, सदर मोठ्या अपघातानंतर सुद्धा वाहतूक प्रशासन जागे झाले नाही, पुन्हा मोठी दुर्घटना होणार याची वाट तर प्रशासन बघत नाही असे विदारक चित्र आम्ही आपल्याला बातमीद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहो.

शहरीकरनात होणारी वाढ व वाहतुकीचे होणारे अतिक्रमण आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसत आहे, मात्र तशी व्यवस्था प्रशासन करण्यास अपयशी ठरत आहे, लोहारा ते चीचपल्ली मार्गावर अनेक धाबे, हॉटेल्स व बार चे साम्राज्य पसरलेले आहे, मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासनासोबत मुजोरी करीत मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे.

कारण या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते, त्यासोबत मार्गावरील दोन्ही बाजूने चारचाकी वाहन अतिक्रमण करतात मग येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मार्ग मिळेल कुठे? विशेष म्हणजे नियम धाब्यावर बसविणाऱ्या हॉटेल मालकांना तंबी द्यायचे सोडून पोलीस सुद्धा याठिकाणी मेजवानी करताना दिसतात, काल टिपलेल्या या व्हिडीओ मध्ये पोलिसांचे वाहन पार्किंग मध्ये असल्याचे कैद झाले आहे.

कायद्याचे रक्षक जेव्हा नियम मोडणाऱ्यांना ताकीद देऊ शकत नाही, मात्र सामान्य जनतेसमोर कायद्याचा पाढा।तर प्रशासन वाचण्यास नेहमी तत्पर असतो हे कुठंतरी थांबायला हवं.

सध्या पोलीस व वाहतूक शाखा कुंभकर्णी झोपेत तर नाही न अशी चर्चा सध्या शहरात रंगली आहे.