त्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावले पालकमंत्री मुनगंटीवार

पालकमंत्री मुनगंटीवार यांचे मानले आभार

News34 chandrapur

मुल – मूल ते नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय कामानिमित्ताने मूल नागपूर असा प्रवास करणाऱ्या नागरिकांचीही संख्या जास्त आहे. पुर्वी पाच ते सहा फेऱ्यांमध्ये सुरु असलेली मूल नागपूर थेट बस सेवा खाजगी बस सेवेमूळे आर्थिक दृष्ट्या परीवहन महामंडळाला तोट्यात जात होती, त्यामूळे परीवहन महामंडळाने अंदाजे 8 ते 10 वर्षापुर्वी मूल नागपूर बस सेवा बंद केली होती, त्यामूळे ज्येष्ठ नागरीकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. Msrtc

परीवहन महामंडळाची बस सेवा सुरु नसल्याने नागरीकांना तुटक प्रवास करत त्रास सहन करावा लागत होता. प्रवाश्यांची अडचण आणि संख्या लक्षात घेवुन खाजागी बस मालकांनी मूल ते नागपूर मोठ्या प्रमाणात खाजगी बस सेवा सुरु केली. त्यामूळे नागरीकांना थेट प्रवासाची सोय मिळत आहे. परंतु प्रवाश्यांच्या अडचणीची संधी साधुन अलीकडे खाजगी बस चालक मालक आणि वाहकांनी प्रवाश्यांना या ना त्या कारणाने त्रास देणे सुरु केले. Guardian minister sudhir mungantiwar

त्यामूळे प्रवाशीही खाजगी बस सेवेला कंटाळले होते परंतु अधिकृत बस सेवे अभावी प्रवाश्यांना साधन नसल्याने मजबुरी का नाम… म्हणत त्रास सहन करत खाजगी बसनेच प्रवास करीत होते. प्रवाश्यांना होत असलेला त्रास आणि अडचण लक्षात घेवुन ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला तत्काळ बस सेवा सुरु करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

या आदेशानुसार एसटी महामंडळाने सकाळी सव्वा सहा वाजता, सकाळी साडे सात वाजता आणि सकाळी दहा वाजता मूलवरून नागपूरसाठी तर दुपारी दोन वाजता, सायंकाळी साडे चार वाजता आणि सायंकाळी साडे पाच वाजता नागपूरवरुन मूलसाठी बस सोडण्यात येणार आहे. मूल-नागपूर मार्गावर एसटी बस सेवा सुरु केल्याने मूल पासुन पुढे नागपूर पर्यंत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महीला आणि विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली आहे. त्यामूळे नागरीकांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.