6 लाख रुपयांसाठी संतोष रावत यांच्यावर गोळीबार

कांग्रेस उत्तर भारतीय संघाचा अध्यक्ष निघाला आरोपी

News34 chandrapur

चंद्रपूर – 11 मे 2023 ला जिल्ह्यातील मूल शहरात रात्री 9.30 च्या सुमारास चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष कांग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
रावत यांच्यावर अज्ञात बुरखा घातलेल्या युवकांनी हल्ला केला असल्याचे निष्पन्न झाले होते, आता या प्रकरणात पोलिसांनी कांग्रेसचे उत्तरं भारतीय संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजविर सिंग यादव ला अटक केल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
11 मे ला भर चौकात संतोष रावत यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला होता, बँक अध्यक्ष व कांग्रेस नेते रावत यांच्यावर हल्ला झाल्याने चंद्रपूर पोलीस प्रशासनाने 15 पथके तयार केली होती.
मात्र पोलिसांना यामध्ये यश मिळत नव्हते, मुख्य आरोपीला अटक करण्यास पोलीस प्रशासनाला आलेले अपयश बघता आमदार माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी 25 मे च्या आत आरोपीना अटक करा अन्यथा जिल्हा प्रशासनाला घेराव घालू असा इशारा दिला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे दिला, नायक यांनी तपासाची चक्रे फिरविली असता 2 दिवसात राजविर यादव व अमर यादव या सख्ख्या भावाना अटक केली.
कारण काय?
मिळालेल्या माहिती नुसार संतोष रावत व राजविर यादव या दोघांमध्ये काही युवकांना नोकरी लावण्यासाठी पैश्याची देवाणघेवाण करण्यात आली होती, ती देवाणघेवाण काही युवकांना वेकोली मध्ये नोकरी लावण्यासाठी 6 लाख रुपये दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, मात्र नोकरी लागली नाही, आणि रावत पैसे परत देत नसल्याने राजविर हा अत्यवस्थ झाला होता, त्या कारणामुळे हे प्रकरण घडलं.
मात्र यामध्ये वेकोली सारख्या मोठ्या उद्योगात नोकरी लावण्यासाठी लाखोंचा व्यवहार होतो, पण या प्रकरणात 6 लाख रुपयांचा व्यवहार संशयास्पद आहे.
गुन्हा उघडकीस कसा आला?
नायक यांच्याकडे तपास आल्यावर त्यांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या बनावट नंबर प्लेट चा आधी तपास सुरू केला, बनावट नंबर प्लेट कुणी तयार केली? याबाबत सखोल तपास केला असता चंद्रपूर शहरातील नंबर प्लेट बनविणाऱ्या कडून पोलिसांना माहिती मिळाली, त्यानंतर राजविर बाबत नंबर प्लेट बनविणाऱ्याकडून माहिती मिळाली, पोलिसांनी 23 मे च्या पहाटे 2 वाजताच्या सुमारास राजविर व त्याच्या भावाला बाबूपेठ येथील राहत्या घरातून अटक केली.
राजविर यादव कोण आहे?
चंद्रपूर ग्रामीण कांग्रेसच्या उत्तर भारतीय संघाचा राजविर जिल्हाध्यक्ष आहे, राजविर हा खासदार बाळू धानोरकर यांचा खंदा समर्थक आहे.
विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
संतोष रावत गोळीबार प्रकरणातील आरोपी हे वेगळं कारण सांगून पळवाटा काढत आहे, मात्र त्यांचा बोलावता धनी दुसरा आहे, आरोपी कोणत्याही पक्षाचा असो त्याने गुन्हा केला आहे, त्याला अभय देण्याचा काही एक प्रश्न नाही, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, मात्र मुख्य सुत्रधाराला अटक करायची असेल तर अटकेत असलेल्या आरोपींची नार्कोटेस्ट करण्यात यावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
नायक शेवटी “नायक” ठरले
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांनी हाय प्रोफाइल प्रकरणी आपल्या कर्तव्य दक्षतेचा वापर करीत तपासाची चक्रे फिरविल्याने 2 दिवसात आरोपीला अटक करण्यास यश प्राप्त झाले, मात्र आरोपी भेटल्यावर राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्या बदली मध्ये सुशीलकुमार नायक यांची जळगाव येथे बदली झाली, मात्र जाता जाता नायक यांनी आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावल्याने त्यांनी तपासात आपली नायकगीरी दाखवली.
जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नावर फक्त एकचं उत्तर दिले, तपास सुरू आहे.
पत्रकार परिषद न घेता पोलीस प्रशासनाने केवळ प्रेस नोट दिली असती तरी चाललं असत अशी चर्चा पत्रकारांमध्ये रंगली होती.