News34 chandrapur
चंद्रपूर – महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात आज आम आदमी पार्टीने जटपुरा गेट येथे आंदोलन केले.
आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले.
Electricity price hike in Maharashtra
शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षात मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत. Aap party
दुसरीकडे दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. या वेळेस बोलताना ‘जे इतर राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही?’ असा सवाल आप चे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांनी केला.
Impact of electricity price hike
आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आता भाजप – शिवसेना सरकार आले आहे. त्यामुळे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी या युती सरकारवर आहे. Protest against electricity price hike
त्यामुळे राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. व मुख्यमंत्री शिंदे हे खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी. अशी खोचक टीका आप चे शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी केली आहे.
याच बरोबर मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात वीज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्यामुळे विजेचे दर जास्ती आहेत, वीज दर कमी राहण्यासाठी वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे, कच्चा माल म्हणजे आयात कोळसा खरेदीमधील कृत्रिम भाववाढ , देशांतर्गत कोळसा खरेदीतील भ्रष्टाचार, संशयास्पद कोळसा धुणे (coal washery) प्रक्रिया आदि बाबींमुळे निर्मिती खर्च फुगत असेल तर त्याची सखोल चौकशी करावी. राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी.’ अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
आजच्या आंदोलनात चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, जिल्हा संघटनमंत्री भिवराज सोनी शहर अध्यक्ष योगेश गोखरे शहर सचिव राजू कूडे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, सुधीर पाटील, स्वप्नील घागरगुंडे, गणेश बनसोड, जितेन्द्र कुमार भाटिया, सिकंदर सागोरे, अशोक महुरकर, मधुकर साखरकर, सुनिल सदभय्या, सय्यद अशरफ अली तथा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते.
–