News34 chandrapur
चंद्रपूर – राज्यात सध्या तलाठी पदाच्या 4 हजारांच्यावर जागा निघाल्या आहे, सोबतच वनरक्षक पदाकरिता नोकरी अर्ज मागविण्यात येत आहे, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा पद्धत काय? पेपर कसा सोडवावा? याकरिता चंद्रपुरात निःशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधून युवासेना जिल्हा चंद्रपूर व एस्पायर प्रोफेशनल अकॅडमी च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक युवतींकरिता निशुल्क तलाठी व वनरक्षक परिक्षेच्या पुर्वतयारीसाठी निशुल्क टेस्ट सिरीज २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.

१ जूलै पासून ते १० जुलै पर्यंत १०दिवसांकरिता रोज सकाळी १० वाजता दिलेल्या स्थळावर ही परिक्षा घेण्यात येत असून चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनी यामध्ये आपली नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक प्रा.निलेश र. बेलखेडे, विभागीय सचिव युवासेना महाराष्ट्र राज्य तथा सदस्य गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी केले आहे.
ज्या उमेदवारांना ह्या निःशुल्क टेस्ट सिरीजमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी या लिंक वर क्लिक करून नोंदणी करावी.