स्वीय सहायकाच्या कानशिलात लगावली

धक्कादायक प्रकार

News34 chandrapur

चंद्रपूर – शासकीय कार्यालयात सुरू असलेली बाबू गिरी स्वतःला स्वीय सहायक समजणाऱ्या एकाला महागात पडली, सदर प्रकार चंद्रपुरात घडला असून एका वाहन चालकाने त्या स्वीय सहायकाच्या कानशिलात लगावली, विशेष म्हणजे हा प्रकार मोठ्या साहेबांच्या समोर घडला.

चंद्रपुर जिल्ह्यात मर्डर

चंद्रपुरातील एका शासकीय कार्यालयातील स्वीय सहायकाचा वाहन चालक सुट्टीवर असल्याने तो कामावर आला नाही, त्या स्वीय सहायकाने वाहन पुरविणाऱ्या कंत्राटदाराला वाहन चालक पाठवा असे निर्देश दिले, कंत्राटदाराने दुसरा वाहन चालक पाठविला, वाहन चालक आला, त्याने स्वीय सहायकाला निर्देशित ठिकाणी नेले, त्यानंतर वाहन चालक जेवण करायला गेला.

चंद्रपुरात 100 पेटी देशी दारू पकडली

स्वीय सहायकाने वाहन चालकाला ताबडतोब यायला सांगितले, त्यावेळी वाहन चालकाने घरी होता, मात्र स्वीय सहायकाचा राग अनावर झाला त्याने वाहन चालकाला अश्लील शब्दात शिवीगाळी केली.

 

वाहन चालक संतापला त्याने ही आपल्या शब्दात स्वीय सहायकाला उत्तर देत मी असे शब्द ऐकायला काम करीत नाही म्हणत त्याने वाहन कार्यालयात आणून जमा करीत मी तुमची नोकरी सोडली असे सांगत तो निघून गेला.

 

मात्र त्या वाहन चालकाच्या मनात स्वीय सहायक विरोधात राग होता, 1 जुलै ला महाकाली कॉलरी वेकोली च्या मुख्य महाप्रबंधक कार्यालय परिसरात वाहन चालक उभा असताना तो स्वीय सहायक चारचाकी वाहनात एका साहेबाला घेऊन येत होता, त्यावेळी वाहन चालकाने ते वाहन थांबविले व स्वीय सहायकाला बाहेर बोलावीत त्याच्या कानशिलात लगावली.

सदर दृश्य अनेकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले, सर्वांसमोर आपल्या कान शिलात लावली म्हणून ही बाब कुणाला सांगायची नाही असा दम स्वीय सहायकाने उपस्थित असणाऱ्यांना दिला.

मात्र ते बिंग फुटलं व वाहन चालकामध्ये चर्चा सुरू झाली आणि हा प्रकार बाहेर आला.

विशेष बाब म्हणजे तो स्वीय सहायक दुसऱ्या विभागात क्लर्क म्हणून काम करतो, मोठया साहेबांच्या मागेपुढे फिरण्यासाठी तो मुख्य कार्यालयात जाऊन बाबूगिरी म्हणजे स्वीय सहायकाचे काम करू लागला.