शैक्षणिक सत्र सुरू पण वसतिगृह कधी सुरू होणार? – सचिन राजूरकर

निवेदन देताना ओबीसी महासंघाचे पदाधिकारी

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्यातील ओबीसी , विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सन 2023-24 याच सत्रात सुरू करण्या साठी बी. देशमुख साहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

 

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्र. वग्रूयो २०२०/ प्र.क्र.०१/ योजना-०५ दिनांक २८ फरवरी २०२३ च्या शासन परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात मुलांना व मुलीना प्रत्येकी एक वसतिगृह सुरु करण्याचे आदेश होते, परंतु सान २०२३-२४ चे शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतरही अजूनही वसतिगृह सुरु करण्यात आले नाही आहे. तरी १५ दिवसात लवकरात लवकर सुरु करावे अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी रवींद्र टोगे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ, दीपक पिपलशेंडे, वैभव सिरसागर, उदय टोगे, प्रशांत पिपलशेडे, राहुल चालुलकर, विशाल धाबेकर, सुमित देवालकर,प्रणाली पिपलशेंडे, प्राची खारकर, साक्षी पिपलशेंडे, सारिका भोयर विद्यार्थी उपस्थित होते.