तो दारू सोडविण्यासाठी गेला मात्र त्याचा मृतदेहचं बाहेर आला

दारू सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात गेला मात्र

News34

चंद्रपूर – आजच्या घडीला भावी पिढीला अनेक व्यसनांनी वेढले आहे, मात्र हे व्यसन त्यांच्या जीवावर अनेकदा बेतून जाते.

असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील व्यसनमुक्ती केंद्रात घडला आहे, शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील परिसरात असलेल्या झेप व्यसनमुक्ती केंद्रात घडला.

27 जुलै ला दारू सोडविण्यासाठी आलेल्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार झेप व्यसनमुक्ती केंद्रात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जुलै ला दारूचे अतिव्यसन सोडविण्यासाठी आरवट निवासी 31 वर्षीय राकेश मारोती उमरगुंडावार याला झेप व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते, मात्र दारूच्या व्यसन सुटत नसल्याने तो मागील 2 दिवसापासून केंद्रातील कर्मचाऱ्यांना दारू साठी त्रास देत होता, त्याला दारू न मिळाल्याने त्याने हा गळफास घेतला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राकेश चे दारूचे व्यसन सुटावे यासाठी कुटुंबाने त्याला 2 ते 3 वेळा झेप व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते मात्र त्यानंतर त्याचे व्यसन काही सुटले नाही, दारू न मिळाल्याने राकेश च्या मनात नैराश्याची भावना आली ज्यामुळे त्याने हे पाऊल उचलले.

घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.