राज्य अभ्यासक्रम आराखड्यात संविधानाचा गाभा घटकांचा समावेश करण्याची मागणी,

 

संविधान फाउंडेशन संयोजक मेश्राम यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन,

गडचिरोली;
राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर आधारित इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय शिक्षणाचा राज्य अभ्यासक्रम आराखडा अंतिमिकरणाचे काम सुरू आहे. राज्यात संविधान तज्ज्ञ विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने आराखड्यात संविधान गाभा घटकांचा समावेश करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गडचिरोली जिल्हा संविधान फाउंडेशन संयोजक गौतम मेश्राम यांनी निवेदनातून केली आहे.

शासनाला पाठविलेल्या निवेदनात राज्य अभ्यासक्रम आराखडा संविधानाचा गाभा घटकांचा समावेशामुळे शालेय शिक्षणातून संविधान मूल्यांचे जतन, देशभक्ती, सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, स्वतंत्र, समता ,न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांची जपणूक करण्याचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच प्रतिबिंबित होण्यास मौलिक मदत होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्र हितासाठी
संविधानिक मूल्यांची जपणूक करून समाजात समता, न्याय, बंधुता प्रस्थापित होण्यासाठी संविधान गाभा घटकांचा समावेश राज्य अभ्यासक्रम आराखड्यात ठोस स्वरूपात असण्याची आवश्यकता आहे, नागरिकांमध्ये संविधान मूल्यांची जागृती करून राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर जनतेचा सहभाग व प्रतिक्रिया नोदविण्याचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवून शालेय अभ्यासक्रम आराखड्यात संविधान गाभा घटकांचा समावेश
करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधान फाउंडेशन जिल्हा संयोजक गौतम मेश्राम यांनी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.