वर्दी शिलाईसह इतर साहित्य विभागाच्या प्रमुख पदाची मुख्य प्रभारी,
गडचिरोली;
जिल्ह्यातील नक्षल्यांच्या विभागाला लागणारी वर्दी व संपूर्ण साहित्य खरेदी व व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या तसेच हिंसक कारवायांमध्ये प्रत्यक्ष सहभागी जहाल महिला नक्षली रीना बोर्रा नरोटे हिने (ता.२७ जुलै) शनिवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.
नक्षल्यांच्या टेलर्स पथकाची डिव्हीसी कमांडर रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, (वय 36) रा. बोटनफुंडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलीचे नाव आहे. रिना नरोटे ऊर्फ ललीता ही सन २००६ साली पेरमिली दलममध्ये सामील झाली होती. सन २००७ पासुन साहित्य पुरवठा पथकाची सदस्य म्हणुन काम करण्यास तिने सुरुवात केली होती. त्यांनतर २००८ मध्ये शिवणकला, कापड कटींग व शिलाई मशिन चालविण्याचे तिने प्रशिक्षण घेतले आणि टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत झाली होती. २०१४ मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन तिने २०२० मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. तसेच २०१९ मध्ये नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या हत्येत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिचेवर आठ लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन तिला एकुण साडेपाच लाख रुपये बक्षिस दिले जाणार आहे. सदर महिला नक्षलीने आत्मसमर्पण कार्यक्रम प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान नागपूर संदिप पाटील, पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्राचे अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक सीआरपीएफ अभियान अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व सीआरपीएफ बटालियन ०९ चे कमांण्डट शंभु कुमार, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी नक्षल चळवळीत सामील नक्षल्यांना , विकासकामांना आडकाठी निर्माण करण्यापेक्षा पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण करूम मुख्य प्रवाहात सामील होऊन लोकशाहीतील मार्गाचे सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन केले आहे.