शहीद विर बाबुराव शेडमाके यांचे बलिदान अविस्मरणीय!

भव्य पुतळा अनावरण प्रसंगी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन!

एटापल्ली; (गडचिरोली)
देश स्वतंत्र्य लढ्याची इंग्रजांशी झुंज देतांना प्राणांची आहुती देणारे, जल, जंगल, जमिनीचे रक्षक थोर योद्धा शहीद विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके हे आजच्या युवा पिढीचे आदर्श असून त्यांचे बलिदान अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी शहीद विर बाबुराव शेडमाके यांचे पुतळा अनवनर प्रसंगी व्यक्त केले आहे.

एटापल्ली तालुक्यातील पेठा या गावात (दि. १२ मार्च) बुधवारी शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंतीचे अवचित्य साधून विर बाबुराव शेडमाके यांचा भव्य पुतळा अनावरण व जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुतळ्याचे अनावरण अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अंब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ब्रिटिश शासकांशी कठोर लढा दिला त्यांचा हा संघर्ष आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. शहीद विर बाबुराव शेडमाके यांची कीर्ती समाजात सदैव प्रेरणादायी राहील, यासाठी उभारलेला पुतळा आदर्श युवा पिढी घडविण्यास मौलिक ठरणार असल्याचे, प्रतिपादन राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले आहे.

त्यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजारोहन आणि शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजे अंब्रीशराव आत्राम यांचे गावात आगमन होताच त्यांचे ढोल, ताश्याच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष तोडसा ग्रामपंचायत सरपंच वनिता कोरामी, प्रमुख वक्ते पंचायत समिती एटापल्लीचे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी सत्यनारायण कोडापे, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी तुषार पवार, उपसरपंच प्रशांत आत्राम, भाजपा महामंत्री मोहन नामेवार, पोलीस पाटील दस्सा कोरमी, लालसू रापांज्जी, रैनू नरोटे, रैजू गावडे, नान्सू मटामी, रामा गोटा, साधू दुर्वा, प्रतिभा तोडेवार, साईनाथ वेलादी आणि बहुसंख्येने संख्येने नागरिक उपस्थित होते.