चंद्रपुरात तापमानाने गाठला उच्चांक

चंद्रपुरात सूर्य आग ओकतोय

News34 chandrapur

चंद्रपूर :-  चंद्रपूर शहरान आज तापमानाचा उच्चांक गाठला. 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले.  शहराची जगात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळख आहे. चंद्रपूरचं तापमान सतत वाढीवर आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा आकडा 43.2 गाठला आहे. बुधवारचे तापमान 42.2 होते, तीन दिवसात 4 अंशाने तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा हा वाढता पारा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्येच हे हाल आहेत, तर पुढच्या महिन्यात पारा कितीवर जाईल, याचा विचारच घाम फोडणारा आहे. High temperature in chandrapur
मार्च महिना लोटल्यानंतरही चंद्रपूरचा खास उन्हाळा सुरू झालेला नव्हता. ठराविक अंतराने येणारी वादळे -अवकाळी पाऊस यामुळे चंद्रपूरचा पारा 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहिला. मात्र मंगळवारी अचानक यात वाढ झाली 41.8 असे उच्चांकी तापमान नोंदवत चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून गणले गेले. मंगळवार 41, बुधवार 42 आणि आता गुरुवारी तापमानाने उच्चांक गाठत 43 डिग्री च्या वर गेले आहे. Record temperature
चंद्रपुरात पारा वाढू लागल्यानंतर नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. शहराच्या विविध भागात दुपारी बारा ते तीन शुकशुकाट दिसू लागला असून नागरिकांनी शीतपेये- उसाचा रस यासह लिंबू पाण्याचा आधार घेणे सुरू केले आहे. दुपारच्या काळात उष्णतेमुळे कुठलीही काम केली जात नसल्याचे स्पष्ट झाले असून घराबाहेर पडायचे झाल्यास चेहरा व अंग झाकून घेत बाहेर पडावे लागत आहे. Hot city chandrapur