चंद्रपुरात वाघिणीसह बछड्याच्या मृतदेह सापडला

News34 chandrapur

चंद्रपूर – वाघांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात आता वाघांचे मृतदेह आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे.
मध्य चांदा वनविभाग परिक्षेत्र धाबा अंतर्गत सुकवाशी डोंगरगावातील जंगलात वाघीण बछड्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.
Tadoba tiger


सध्या वाघिणीच्या इतर बछड्यांचा शोध वन विभाग करीत आहे. सदर घटना सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक 163 व 161मध्ये घडली. बछड्याचा मृतदेह हा 161 मध्ये आढळून आला. यावर वन विभागाणे शोध मोहीम घेतली असता कक्ष क्रमांक 163 मध्ये वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही वाघाना अग्नी दिला.
Tiger capital chandrapur
अंदाजे ४ महिन्याचा वाघाचा बछडा (मादी) मृत्यू झाल्याचा 24 मार्चला सायंकाळी उशिरा आढळून आला. सदरच्या बछड्या चे सर्व अवयव सुरक्षित असून प्राथमिक दृष्ट्या त्याचा मृत्यू डीहायड्रेशन व स्टारवेशन ने झाला असल्याचे दिसून आले. चंद्रपूर महानगरपालिका एक्शन मोड मध्ये
Death of tigress and calf in Chandrapur
बछड्या च्या मृत्यू नंतर सदरचा वनपरिसर वनकर्मचारी यांनी दिनांक २५ मार्च रोजी सकाळी शोध मोहिम राबविली असता डोंगरगाव बीट, कक्ष क्रमांक १६१ मधे वयस्क मादी वाघ मृत असल्याचे दिसून आले. NTCA च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पशू वैद्यकीय अधिकारी श्री कुंदन पोडचेलवार, TTC चंद्रपूर व श्री पराग खोब्रागडे पशुधन विकास अधिकारी गोंडपिंपरी यांचा चमू, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार, प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी श्री मुकेश बांदककर, NTCA चे प्रतिनिधी श्री बंडू धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी करून वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर वाघ अंदाजे ८- ९ दिवसा आधी मरण पावला असल्यामुळे मृत्यू चे कारण कळले नाही. सदर मादीचे सर्व अवयव सुरक्षित असून शिकारी चे कोणतेही पुरावे दिसून आले नाही. मादी वाघ चे दहन मोक्या वरती करून पंचनामा नोंदविण्यात आला. Chandrapur breaking news
 सदर मादी मृत्यू मुळे तिचा च बछडा उपासमारी मुळे मेल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सदर बछड्या चे शवविच्छेदन TTC चंद्रपूर येथे उपवनसंक्षक मध्य चांदा यांच्या समक्ष करून अवयवाचे नमुने गोळा करून पुढील तपास साठी मिनी फॉरेन्सिक प्रयोगशाळा चंद्रपूर येथे पाठवण्यात येतील. 
         पुढील तपास वनगुन्हा जारी करून वनपरिक्षेत्र अधिकारी धाबा व सहाय्यक वनसंरक्षक करीत आहेत.