चंद्रपूर जिल्ह्यातील IAS अधिकाऱ्याला न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश

न्यायालयाचा दणका

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्ते हे वाहतुकीसाठी बंद असतात, वर्ष 2022 मध्ये गोंडपीपरी तालुक्यातील नवीन पोडसा, वेडगाव, सकमुर मार्ग हा पावसाळ्यात पूर्ण बंद अवस्थेत असतो, त्याकारणामुळे ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात त्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात. Zilla parishad chandrapur

या समस्येवर चंद्रपूर जिल्ह्यातील पाथ फाउंडेशन ने दखल देत याची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे केली होती, याआधी सुद्धा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी गौडा यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.
२५ ऑगस्ट २०२२ रोजी पाथ फाउंडेशनने मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेची आयोगाने गंभीर दखल घेतली असून, न्यायमूर्ती एम. ए. सयीद यांच्यासमक्ष १७ एप्रिल २०२३ रोजी चंद्रपूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हजर राहण्याचा आदेश सोमवारी (दि. ३) दिला आहे. Chief executive officer
मागील पावसाळ्यात गोंडपिपरी तालुक्यातील नवीन पोडसा येथील गर्भवती माता पिंकू सुनील सातपुते या महिलेला प्रसूतीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. वेडगाव येथील आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व सोयी सुविधा नव्हत्या. पावसाने वेडगाव – सकमूर मार्गाला बेटाचे स्वरूप आले होते. या भीषण परिस्थितीत सातपुते कुटुंबीयांनी जीव मुठीत धरून वेडगाव ते सकमूरपर्यंत डोंग्याने प्रवास करीत त्या गर्भवती मातेला गोंडपिपरीला आणले. तिथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रश्नांबाबत पाथ फ़ाउंडेशनचे संस्थापक ॲड. दीपक चटप, ॲड. बोधी रामटेके, समीर निमगडे व संदीप रायपुरे यांनी मानवाधिकार आयोग, मुंबई येथे याचिका दाखल केली होती. या याचिकेची आयोगाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती एम. ए. सयीद यांच्यासमक्ष १७ एप्रिल २०२३ रोजी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हजर राहण्याचा आदेश दिला आहे. Human rights commission
आरोग्य सुविधा मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. गोंडपिपरी तालुक्यातील आरोग्याचे प्रश्न भीषण आहेत. रुग्णवाहिका व वैद्यकीय विभागातील रिक्त जागा भरती, सुसज्ज आरोग्य केंद्र आणि पावसाळ्यापूर्वीच लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत मानवाधिकार आयोगात तपशीलवार माहिती पाथ संस्थेच्या माध्यमातून सादर करू.
ॲड. दीपक चटप, संस्थापक पाथ फाउंडेशन