चंद्रपूरच्या ताडोब्यात आला BirdMan

ताडोबा राष्ट्रीय उद्यानात आला बर्डमॅन

News34 chandrapur

चंद्रपूर – आजपर्यंत आपण सुपरमॅन, स्पायडरमॅन व पॅडमॅन च्या कथा व चित्रपट बघितले असतील मात्र आज आपण खऱ्या आयुष्यातील बर्डमॅन बाबत आपल्यासमोर परिचित करणार आहोत. Birdman in chandrapur

हिंगोली जिल्ह्यातील सुमेध वाघमारे हा युवक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला, त्याने शेळ्या राखण्याचे काम केले, मात्र त्याला प्रेरणा मिळाली ती मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यापासून, झाडांना वाचविण्यासाठी शिंदे यांनी एक चळवळ सुरू केली व ती आजही सुरूच आहे. Tadoba national park
शिंदे यांचा आदर्श मनात बाळगून सुमेध ने पक्षी व त्यांचे विविध आवाजावर लक्ष केंद्रित करीत, मानवी जीवनापासून त्यांना किती धोका आहे व त्यातून त्यांना कसे वाचवायचे याबाबत सुमेध ने एक मोहीम छेडली.

शेळ्या राखत असताना सुमेध ने पक्ष्यांचे आवाज काढणे सुरू केले असे करता करता तो तब्बल 200 पक्ष्यांचे आवाज काढू लागला.
त्यानंतर आपण सुरू केलेली चळवळ ही असंख्य नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी तो कार्यरत होता, विविध ठिकाणी तो याबाबत कार्यक्रम घेत नागरिकांना पक्ष्यांबाबत माहिती देऊ लागला.
एक ताडोबा अभयारण्य येथे विविध कंत्राटी जागेकरिता जाहिरात निघाली ती जाहिरात बघून सुमेध चंद्रपुरात आला, मात्र त्यांच्यातील कला बघता ताडोबा क्षेत्रातील सहायक उपसंचालक जितेंद्र रामगावकर यांनी सुमेध ला नॅचरलिस्ट या पदावर नेमणूक केली. Wild tadoba
ताडोबामध्ये कार्यरत असलेले सुमेध वाघमारे हे तब्बल २०० पशु, पक्ष्यांचे आवाज काढतात. चिमणी, कावळा, मोर, लांडोर, कोंबळी, कोकीळा, रानम्हैस, रानगवा यासह २०० हून अधिक पशु व पक्ष्यांचे आवाज काढून पर्यटकांना याबद्दल माहिती देत आहे. यामाध्यमातून ते निसर्गाला वाचविण्याचा संदेश देत असतात.
आता सुमेध ताडोबा येथे वाघाला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पक्ष्याबाबत माहिती देत जनजागृती करण्याचे काम सुरू केले. पक्ष्यांबाबत माहिती देताना सुमेध हा विविध पक्ष्यांचे आवाज काढतो, अनेकांना पक्ष्याचे नाव सुद्धा माहीत नसते, सुमेध च्या माहितीनंतर पर्यटकांना पक्ष्याबाबत नवी माहिती कळते. सुमेध म्हणतो की जंगलात पर्यटक फक्त वाघ बघायला येतात मात्र जंगलात वाघ हा एकमेव प्राणी नाही, सोबत अनेक वन्यप्राणी व पक्षी या जंगलात राहतात, त्यामुळे जंगल हे समृद्ध आहे.
सुमेध चे एकच लक्ष्य आहे की माझ्या माहितीनंतर पक्षी वाचला पाहिजे, यासाठी माझी ही मोहीम सुरू राहील अशी माहिती सुमेध ने दिली आहे.