News34 chandrapur
चंद्रपूर – परम पुज्यनिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता मंच चंद्रपूर तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, जिल्हा कार्यवाह शैलेश पर्वते, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती,चंद्रपूर चे अध्यक्ष वसंतराव थोटे, समरसता मंचाचे जिल्हा संयोजक डॉ. नंदकिशोर मैदळकर यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले. RSS
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विद्याभारती, विश्व हिंदू परिषद, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती,चंद्रपूर, भारतीय मजदूर संघ ग्राहक मंच, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, धर्म जागरण मंच व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध शाखेतर्फे स्वयंसेवक उपस्थित होते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.