पर्यटकांसाठी ताडोबा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

ताडोब्यात जंगल सफारीचा आनंद घ्या आता नव्या वेळेनुसार

News34 chandrapur

चंद्रपूर – वाढत्या तापमानाचा प्रादुर्भाव बघता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने पर्यटकांसाठी महत्वाचा निर्णय घेत जंगल सफारीच्या वेळेत बदल केला आहे. Tadoba jungle safari booking

मागील आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान 40 ते 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात तापमान वाढीत प्रथम क्रमांकावर गेले.

राज्यात उष्माघाताचे नागरिक बळी पडल्याच्या घटना सुद्धा घडल्याने पर्यटकांच्या बाबतीत असे काही घडू नये याची खबरदारी घेत ताडोबा प्रशासनाने जंगल सफारी सकाळी 5.30 ते सकाळी 9.30 व सायंकाळ फेरीसाठी दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. Tadoba national park chandrapur

सदर आदेश आजपासून लागू करण्यात आला असून पर्यटकांनी आपल्या सोयीनुसार जंगल सफारीचा आनंद घ्यावा असे एन. व्ही.काळे उपसंचालक कोर यांनी कळविले आहे. heatstroke