आई मी कटिंग करायला जातो….पण तो परतलाचं नाही

चंद्रपूर पोलीस करीत आहे या युवकाचा शोध

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील लालपेठ क्रमांक 1 मध्ये राहणारा 21 वर्षीय प्रणित दीपक मद्दीवार हा 20 एप्रिल पासून बेपत्ता असल्याची तक्रार चंद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये करण्यात आली आहे. Missing cass

20 एप्रिलला सकाळी 11 वाजता प्रणित ने आईला कटिंग करायला जातो असे सांगत घराबाहेर निघाला मात्र सायंकाळी झाल्यावर सुद्धा प्रणित घरी न आल्याने वडील दीपक मद्दीवार यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला, त्याच्या मित्रांना याबाबत विचारणा सुद्धा केली मात्र प्रणित कुठेही आढळला नाही. Chandrapur city police

त्यानंतर मद्दीवार यांनी याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.
सध्या प्रणित च्या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के व पोलीस कर्मचारी संजय धोटे करीत आहे.

प्रणित बाबत कुणालाही माहिती मिळाल्यास जर कुणाला तो दिसला तर याबाबत भ्रमणध्वनी क्रमांक 07172-251200, 252200 व 8975750579 वर संपर्क करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांनी केले आहे.

युवकाचे वर्णन

उंची 5 फूट 5 उंच, रंग गोरा, बारीक दाढी व मिशी, चेहरा लांब, बांधा – सडपातळ, घरून निघताना प्रणित ने अंगात निळ्या रंगाची हाफ टीशर्ट, पिवळ्या कॉलरची, व निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट, प्रणित जवळ मोबाईल नसून त्याला तेलगू, हिंदी, मराठी व इंग्लिश भाषा बोलता येते.