चंद्रपुरातील “शेट्टी” निघाला अट्टल चोर

चंद्रपूर पोलिसांना मिळालं मोठं यश

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरात राहून जिल्ह्याबाहेर गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार रामनगर पोलिसांच्या हाती लागल्याने त्याच्यावर 16 गुन्हे दाखल असल्याची बाब तपासात उघड झाली आहे. Chain snatcher

1 एप्रिलला चंद्रपुरातील 33 वर्षीय नीलम देशपांडे या रात्री 9 वाजता कामावरून मोपेड गाडीने घरी परत असताना गुलमोहर कॉलोनी मार्गावर पांढऱ्या रंगांच्या गाडीवर एक इसम बसला होता त्याने नीलम यांच्या गळ्यातील 4.5 ग्राम वजनाची सोन्याची चैन हिसकावली. Chandrapur police

त्याबाबत नीलम देशपांडे यांनी कलम 392 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली होती.

2 एप्रिलला सिस्टर कॉलोनी मध्ये राहणाऱ्या रंजना वैद्य या सकाळी मॉर्निंग वॉक करीत असताना रहमतनगर मार्गावरून एक इसम पांढऱ्या रंगांच्या वाहनाने येत रंजना वैध यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, याबाबत रंजना वैद्य यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

6 एप्रिलला विकास रामचंद्र बलकी हे सकाळी 5 वाजता पत्नीसह मंदिराकडे जात असताना त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र पांढऱ्या गाडीवर आलेल्या इसमाने हिसकावून नेले.

चंद्रपुरात सलग घडत असलेल्या चैन स्नॅचिंग च्या घटना घडत असल्याने रामनगर पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून बघितले पण त्याबाबत काही माहिती पोलिसांना मिळाली नाही.

आरोपीच्या गुन्ह्याची पद्धत बघता रामनगर पोलीस व गोपनीय बातमीदार यांनी सतत घटनास्थळ परिसरात साध्या वेशात 6 दिवस पाळत ठेवण्यात आली होती.

14 एप्रिलला पोलीस पथक सापळा रचून पाळत ठेवत असताना सदर वर्णनाचा व्यक्ती पठाणपुरा गेट ने चंद्रपूर शहरात प्रवेश करताना पोलिसांना आढळला, सदर इसमाचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला असता तो MIDC पडोली या मार्गावरून दुचाकी वाहनाने वेगात निघाला, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी चारचाकी वाहनाने त्या इसमाच्या दुचाकीला मागून धडक दिली.

वाहनांच्या धडकेत तो इसम बाजूला पडला असता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तिथून पळ काढला, पोलिसांनी त्या इसमाची दुचाकी जप्त केली, परिसरात त्याचा सर्वत्र शोध घेतला असता त्याचा पॅन्ट पोलिसांना आढळला, त्यामध्ये मिरची पावडर आढळून आले, त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

त्या इसमाची दुचाकीबाबत सविस्तर माहिती पोलिसांनी काढली व तात्काळ आंध्रप्रदेश व तेलंगाणा राज्यात चंद्रपूर पोलिसांनी धडक दिली, तिथून त्या इसमाची माहिती काढत पोलीस परत आहे.

काही दिवसांनी गोपनीय बातमीदाराने पोलिसांना त्या इसम बाबत माहिती देत सध्या वर्धा जिल्ह्यातील शांतीनगर येथील, तिरुपती अपार्टमेंट मध्ये तो इसम असल्याची बाब सांगितली.

माहिती मिळताच पोलिसांचे पथक वर्धा जिल्ह्यात दाखल झाले, तिरुपती अपार्टमेंट मध्ये पोलिसांनी प्रवेश केला असता एका फ्लॅट चे दार ठोठावले मात्र आतून महिलेने विचारपूस सुरू केली, पोलिसांनी परिचय देताच महिला आरडाओरडा करू लागली, यावेळी स्थानिक पोलिसांना पाचारण केले व महिलेला विश्वासात घेत फ्लॅट मधील दार उघडण्यात आले.

सदर रूम मध्ये पोलिसांना पाहिजे असलेला इसम नामे सूरज श्रीराम कोरवन (शेट्टी) ला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने चंद्रपुरातील चैन स्नॅचिंग गुन्ह्याची कबुली दिली.

यावेळी पोलिसांनी चंद्रपुरात घडलेल्या चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील चोरी गेलेले सोन्याचे दागिने जप्त करीत एकूण 1 लाख 38 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सूरज शेट्टी वर आंध्रप्रदेश, तेलंगाणा, नागपूर व आदीलाबाद येथे तब्बल 16 घरफोडी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सूरज शेट्टी हा स्थानिक चंद्रपुरातील बालाजी वार्डातील रहिवासी आहे, त्याने अनेक ठिकाणी घरफोडी व चैन स्नॅचिंग सारखे गुन्हे केले असून गुन्हा केल्यावर तो काही दिवस दुसऱ्या जिल्ह्यात जात होता, तिथे सदर गुन्हे करीत पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात पलायन करीत होता, मात्र चंद्रपुरातचं त्याची योजना फसली आणि तो इथे अडकला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी रजनीकांत पुठ्ठावार, किशोर वैरागडे, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, चिकाटे, मिलिंद दोडके, भावना रामटेके व सायबर पोलीस प्रशांत लारोकर यांनी केली.