News34 chandrapur
चंद्रपूर – 25 एप्रिलला वरोरा रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर वादळी वाऱ्याने हाय टेन्शन केबल तुटून पडल्याने अनेक एक्सप्रेस गाड्या 3 तास उशिरा निघाल्या. Chandrapur railway
सदर घटनेला 24 तास उलटत नाही तर पुन्हा चंद्रपुरात एक मोठी दुर्घटना होता होता टळली.
गोंदिया-बिलासपूर मुख्य रेल्वे लाईन मार्गावरील रेल्वे रूळ तुटलेल्या अवस्थेत होते, सदर तुटलेल्या अवस्थेतील रेल्वे रूळ त्याठिकाणी जात असताना एका युवकाला दिसली. Indian railway
त्याने ही बाब तात्काळ बाबूपेठ रेल्वे केबिन वर जाऊन स्टेशन मास्टर ला सांगितली.
स्टेशन मास्टर ने रेल्वे कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्याठिकाणी धाव घेतली असता सदर रेल्वे रूळ बघितल्यावर रेल्वे कर्मचारी थक्क झाले, त्यांनी तात्काळ त्या रुळाची दुरुस्ती करीत त्याठिकाणी नवे रूळ लावण्यात आले, त्यांनतर रेल्वे गाड्या पास करण्यात आल्या. The railway track was broken
जर वेळेवर ही बाब कळली नसती तर आज चंद्रपुरात मोठी घटना घडली असती.
रेल्वे रूळ दररोज तपासणे हे रेल्वे कर्मचाऱ्यांचे काम आहे मात्र सध्या कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याने सदर प्रकार घडला.
26 एप्रिलला सकाळी सदर बाब उघडकीस आली.
या सर्व प्रकरणावर रेल्वे प्रशासन काहीही बोलण्यास असमर्थ आहे, त्यांना याबाबत सम्पर्क साधला मात्र ते काही बोलायला तयार नाही.