चंद्रपुर जिल्हा बाजार समिती निवडणुकीत राजकीय पक्षांचा “ये रिश्ता क्या कहलाता है?”

बाजार समिती निवडणुकीत विरोधक आले एकत्र

News34 chandrapur

चंद्रपूर – राजकारणात सत्ता काबीज सध्या दररोज नवं-नवे आघाडीचे प्रयोग होताना दिसत आहे, एकमेकांचे कट्टर विरोधक सध्या निवडणुकीत आघाडी करीत मतदारांना मूर्ख बनविण्याचे काम असताना दिसत आहे.

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली, मात्र स्थानिक निवडणुकीत चित्र जरा उलट आहे, नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक धक्कादायक निकाल पुढे आले आहे, चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेसने चक्क भाजपशी हातमिळवणी करीत कांग्रेसला हरविले.

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांग्रेस व भाजप ने आघाडी तयार करीत निवडणूक लढवली, यामध्ये भाजपने 8 व कांग्रेसने 4 जागेवर विजय मिळविला, कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या गटाला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले, कांग्रेसचे आमदार व माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांची या निवडणुकीत गटबाजी पुढे आली आहे.

 

मूल, चंद्रपूर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासदार धानोरकर गटाला पराभव पत्करावा लागला. मूल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार विजय वडेट्टीवार विरुद्ध खासदार धानोरकर अशी निवडणूक झाली, यामध्ये वडेट्टीवार गटाने जोरदार मुसंडी मारत एकतर्फी विजय मिळवला.

वरोरा येथे कांग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व मनसे ने आघाडी तयार करीत खासदार व आमदार धानोरकर गटाला आव्हान देत निवडणूक लढली व 9 जागेवर विजय मिळविला. Apmc election result 2023

जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत कांग्रेस 4 भाजप 2, कांग्रेस भाजप आघाडी 2 व वरोरा येथे कांग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व मनसे आघाडी ने विजय प्राप्त केला.

9 बाजार समिती च्या निवडणूक निकालात कांग्रेसने कांग्रेसला हरविले असून वडेट्टीवार व भाजपचे नेते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची छुपी मैत्री यामाध्यमातून पुढे आली आहे. Chandrapur election result

खासदार धानोरकर गटाला वडेट्टीवार व मुनगंटीवार गटाने मात देत बाजार समिती निवडणुकीत मुसंडी मारली आहे.

देशात व राज्यात सध्या कांग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला पण स्थानिक निवडणुकीत विरुद्ध पक्षाशी हातमिळवणी करीत सत्तेसाठी निवडणूक लढवली.

वाद झाला तर कार्यकर्ते एकमेकांना भिडतात पण नेते वरच्या पातळीवर एकत्र येत निवडणूक लढवीतात यामध्ये नुकसान कार्यकर्त्यांचे होत आहे.

चंद्रपुरात भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी खासदार धानोरकर गटाला मात देत आनंद साजरा केला.

खासदार धानोरकर हे कांग्रेस पक्षाला नकोसे तर झाले नाही न असा संदेश ह्या निवडणुकीत दिला गेला काय? असे अनेक प्रश्न बाजार समिती निवडणुकीनंतर उपस्थित झाले आहे.

सध्या देशाचे हवामान बदलत असून कोणता ऋतू सुरू आहे याबाबत साशंकता निर्माण झाली आहे आता त्याचप्रमाणे राजकारणात सुद्धा दिवसेंदिवस बदल होत आहे, या दोन्ही घडामोडी सध्या मानवी जीवनाला घातकचं आहे.