News34 chandrapur
चंद्रपूर – जगप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यानात दरवर्षी लाखो पर्यटक वाघाला बघण्यासाठी विविध ठिकाणांहून येत असतात, मात्र पहिल्यांदाच मुंबई येथील पर्यटकांचा जंगल सफारी दरम्यान मृत्यू झाल्याची घटना 1 मे महाराष्ट्र दिनी घडली. Tadoba national park chandrapur
1 मे ला ताडोबा कोर क्षेत्रातील काळा आंबा परिसरात जंगल सफारी दरम्यान मुंबई येथील पर्यटक 71 वर्षीय केशव रामचंद्र बालगी यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. Jungle safari tadoba
पर्यटक मार्गदर्शक व वाहन चालकाने तात्काळ बालगी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बु. येथे आणले मात्र उपचाराआधी बालगी यांचा मृत्यू झाला, वैद्यकीय अधिकारी यांनी पर्यटक बालगी यांना मृत घोषित केले.
पर्यटक बालगी हे आपल्या कुटुंबियासमवेत जंगल सफारी साठी ताडोबा येथे आले होते मात्र त्यांची ही सफारी शेवटची ठरल्याने बालगी कुटुंबात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Tourist die in tadoba