News34 chandrapur
चंद्रपुर/मुंबई – देशात आज मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी वाढत आहे, दररोज नव्या मार्गाचा अवलंब करीत हे गुन्हे घडत आहे, सदर गुन्ह्याला बळी पडणारे उच्च शिक्षित नागरिक आहे. IPS vishwas nangre patil
सोशल मीडिया चा वापर करीत एखाद्याचे बनावट प्रोफाइल बनवीत मित्रांना पैश्यासाठी संदेश पाठविण्याचे प्रकार वाढले आहे, यामध्ये अनेकजण बळी सुद्धा पडले आहे, मात्र राज्यातील IPS लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले. Cyber crime
मात्र समाजमाध्यम असो की सामाजिक जीवन यामध्ये नेहमी सक्रिय आणारे नांगरे पाटील हे आधीच सतर्क झाले व आपल्या फेसबुक अकाउंट वरून याबाबत मित्रांना माहिती दिली. Facebook fake account
नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून बनावट अकाउंट चा स्क्रीनशॉट शेअर करीत सदर माहिती दिली आहे, त्यामध्ये पाटील यांनी काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे, व त्यांनी माझ्या संपर्कात असलेल्या मित्रांना संदेश सुद्धा पाठविला आहे, आपण त्या संदेशाला प्रतिसाद देऊ नका व आपण आपली माहिती देऊ नका, याबाबत सायबर पोलिसात तक्रार दिली असून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.